नागपूरमध्ये कोरोनामुळे २४ तासांत ५८ मृत्यू; २,८८५ नवीन रुग्णांची नोंद

नागपूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाची (कोविड-1) लागण झालेल्या 2885 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यासह 58 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यात सोमवारी कोरोनाची (कोविड-1) लागण झालेल्या 2885 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यासह 58 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1705 रुग्णांना दवाखान्यातून सुटीही देण्यात आली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण नोंद 1.81 लाख इतकी करण्यात आली आहे.

    ताज्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी 2 लाख 26 हजार 38 इतकी पोहोचली आहे. मृत्यूसंख्या 5098 इतकी नोंदविण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी 997 रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर 1884 रुग्ण नागपूरच्या शहरी भागातील आहेत. आजच्या मृतकांपैकी 34 मृत नागपूर शहरातील तर 4 जण जिल्ह्याबाहेरील आहेत.