नागपुरात कोरोनाची लाट ओसरली; शनिवारी ७५ नवीन कोरोना रुग्ण आढळले

कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात मनपाचा आरोग्य विभाग (The Corporation’s health department) आणि जिल्हा प्रशासनास (the district administration) मोठे यश आले आहे. दोन्ही विभागातील कर्मचारी, डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न (The efforts) मार्गी लागले आहेत.

    नागपूर (Nagpur).  कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात मनपाचा आरोग्य विभाग (The Corporation’s health department) आणि जिल्हा प्रशासनास (the district administration) मोठे यश आले आहे. दोन्ही विभागातील कर्मचारी, डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न (The efforts) मार्गी लागले आहेत. परिणामी, नागपुरकरांनी कोरोनावर मात केली आहे.

    शहरात शनिवारी १२ जून रोजी केवळ ७५ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. प्रशासकीय अहवालानुसार शनिवारी कोरोनामुळे केवळ 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. शहरात शुक्रवारी ११ जून रोजी केवळ ८९ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामध्ये शहरातील ५०, ग्रामीण भागातील ३७ आणि जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. यासह ०७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती.

    मागील 15 दिवसांमध्ये शहरात कोरोना रुग्णांची आकडेवारी आणि मृत्यूचे प्रमाण यामध्ये कमालीची कमतरता आली आहे. यामुळे संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तरीही नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर नियमितपणे वापरावे. गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास डाॅक्टरांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.