नागपुरात गुरुवारी ३४ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद; तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) ओसरल्यानंतर आता ‘डेल्टा प्लस’ (Delta Plus) या नव्या विषाणूचा (new virus) प्रादूर्भाव रुग्णांमध्ये (patients) होत आहे. प्रशासनाने (The administration) यावर नियंत्रण मिळविण्यासाठी (to control) कंबर कसली असून 100 डेल्टा प्लस रुग्णांचे नमुने ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे’ (the National Virology Laboratory) पाठविले आहेत.

    नागपूर (Nagpur). कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) ओसरल्यानंतर आता ‘डेल्टा प्लस’ (Delta Plus) या नव्या विषाणूचा (new virus) प्रादूर्भाव रुग्णांमध्ये (patients) होत आहे. प्रशासनाने (The administration) यावर नियंत्रण मिळविण्यासाठी (to control) कंबर कसली असून 100 डेल्टा प्लस रुग्णांचे नमुने ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे’ (the National Virology Laboratory) पाठविले आहेत. दरम्यान नागपुरात गुरुवारी ३४ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत.

    नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, कोरोनामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. आरोग्य विभागाकडून गुरुवारी ७६२७ संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली.
    कोरोनामुक्त झालेल्या १०७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

    प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेचा विचार करता लाॅकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेला रोखायचे असल्यास नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.