नागपुरात कोरोनाचा विळखा घट्ट

नागपूर जिल्ह्यात ( Nagpur District) एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. उपचाराच्या प्रतीक्षेत नागपुरात लोकांचा जीव जात असल्याचे समोर आलं आहे.

नागपूर : नागपुरात ( Nagpur ) कोरोना रूग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये (Last Two Days ) नागपुरात कोरोनाचे २५०० नवे कोरोनाबाधित रूग्ण ( Corona Patient ) आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन दिवसांत ९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची संख्या वाढल्यामुळे नागपूर जिल्ह्यात सध्या भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात ( Nagpur District) एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. उपचाराच्या प्रतीक्षेत नागपुरात लोकांचा जीव जात असल्याचे समोर आलं आहे. शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कडक लॉकडाऊनची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, नागपुरात ६५ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून मेयो रुग्णालयात ३१ डॉक्टरांना कोरोना झाल्याचे समोर आले. नागपुरातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट घटून ४७.११ टक्क्यांवर गेला आहे.