nmc covid hospital

  • महत्त्वाच्या कामाशिवाय कार्यालयात येऊ नका

नागपूर. (Nagpur) शहरात सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव (covid infection) पसरत असून महानगरपालिकेमध्येही दिवसेंदिवस धोका वाढतच आहे. मनपा (NMC) मुख्यालयासह झोन कार्यालय, विविध विभागातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आतापर्यंत २२६ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी १२ जणांचा मृत्यू (death) झाला आहे. मनपा कार्यालय प्रत्येक कार्यालयीन दिवशी सुरू असल्याने अनेक जण संपर्कात येतात. त्याचाच फटका येथीळ उपायुक्‍त घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्‍त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २२६ जणांना बसला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. मनपामध्ये कोणत्याही महत्वाच्या कामाशिवाय येण्याचे टाळावे, असे आवाहन ‘महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शिक्षण विभाग सर्वाधिक कोविड प्रभावित
सर्वाधिक संसर्ग मनपाच्या शिक्षण विभागात झाला आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील ३६ अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून यापैकी ४ज णांना जीव गमवावा लागला आहे. गांधीबाग झोन कार्यालयातील असून येयील ३४ पॉझिटिव्ह रुग्णांमधून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हनुमाननगर झोनमध्येही २५ कर्मचारी कोरोनाबाधित तर दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय अग्निशमन विभागात ३६, धरमपेठ झोन कार्यालयात २५, सामान्य प्रशासन विभागातील २१ कर व कर आकारणी विभागातील 12, घनकचरा व्यवस्थापन विभागातील 8, आसीनगर झोन कार्यालयात १७, नगररचना विभागात ५, कपिलनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५, शेंडेनगर नागरी प्रायमिक आरोग्य केंद्रातील ४, हुडकेश्वर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, क्रीडा व सांस्कृतिक विभागातील २, जाहिरात विभाग, जयताळा माध्यमिक शाळा आणि झोपडपट्टी भाडे पट्टा वाटप विभागातील प्रत्येकी १ जण कोविड पॉजिटीव्ह आहे.

येथे संपर्क साधावा
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि विनाकारण फिरणे टाळावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे लक्षणे आढळल्यास नजीकच्या मनपा कोविड चाचणी केंद्रात (covid test center) चाचणी करावी. तसेच लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी झोनच्या ०७१२-२५५१८६६, ०७१२-२५३२४७४ व १८००२३३३१६४ या कॉल सेंटरवर संपर्क साधावा. याशिवाय कुठल्या रुग्णालयात (Hospital) बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घेण्यासाठी ०७१२-२५६१०२१ या क्रमांकावर कॉल करावे.


महापौरांचे कार्यालयाल बाधित

शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी (sandip joshi) यांच्या वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापौर कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी त्याचा अहवाल आला असून महापौरांचे स्वीय सहायकही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महापौर संदीप जोशी आणि कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी नियमानुसार गृहविलगीकरणात राहतील

मार्चपासून सुरू झालेले कोरोनाचे संक्रमण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ‘आऊट ऑफ कंट्रोळ’ होत आहे. गुरुवारी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आतापर्यंत कोरोनाने १५१६ लोकांचे बळी घेतले आहे. तसेच वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळेच रुग्णांची मृत्यूसंख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. आता तर कोरोनाचा वेग फारच वाढला असून दररोज हजारो संक्रमित होत आहे. अशातही लोकांमध्ये बेजबाबदारपणा कायम आहे. कोरोनावर नियंत्रण मिळत नसल्यामुळे मनपा प्रशासनाने आता मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू केळी आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे नाही. खासगी हॉस्पिटलमध्येही २-३ दिवसांचे वेटिंग सुरू आहे. प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनाही प्रभावी सिद्ध झाल्या नाहीत. त्यामुळेच लोकांमध्ये महामारीसंदर्भात दहशतीचे वातावरणही वाढतच आहे. डॉक्टरांनुसार जर लोकांनी जबाबदारीने नियमांचे पाळन केले असते तर आज ही परिस्थिती ओढावली नसती.

१६४९० एकूण संक्रमित

११८९५ लोक बरे झाले 

११५१३ लोकांना सुटी

गुरुवारी वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून आलेल्या १९३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यासह आता जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या ४६४९० झाली आहे. गुरुवारी १५१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात ३३०७९ लोक बरे होऊन घरी परतले आहे. तसेच आयसोलेशनमध्ये असलेले १८५१५ रुग्णही बरे झाले आहे. त्यामुळे आता रिकव्हरी रेट ११.१५ टक्‍के झाला आहे.