Covin Portal's Gaudbengal; Registration is possible 7 times with different IDs

कोविन पोर्टलवर घोळच असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. कोणताही व्यक्ती मोबाईल क्रमांक आणि आयडी बदलून कितीही वेळा लस घेऊ शकतो. जर तुम्हाला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नको असेल तर कोणताही व्यक्ती आपल्या अन्य आयडीवरून नवी नोंदणी आणि वेळापत्रकानुसार 84 दिवसांऐवजी 28 दिवसानंतरच दुसरा डोस सहजगत्या घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्य कोविन पोर्टलमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. यात एकच मोठी अडचण अशी आहे की संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र मात्र मिळणार नाही.

  नागपुर : कोविन पोर्टलवर घोळच असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. कोणताही व्यक्ती मोबाईल क्रमांक आणि आयडी बदलून कितीही वेळा लस घेऊ शकतो. जर तुम्हाला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नको असेल तर कोणताही व्यक्ती आपल्या अन्य आयडीवरून नवी नोंदणी आणि वेळापत्रकानुसार 84 दिवसांऐवजी 28 दिवसानंतरच दुसरा डोस सहजगत्या घेऊ शकतो. केंद्र सरकारच्या लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्य कोविन पोर्टलमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. यात एकच मोठी अडचण अशी आहे की संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र मात्र मिळणार नाही.

  नव्या त्रुटी

  पोर्टलवर नोंदणीवेळी आयडी आणि त्यात नमूद असलेल्या जन्मतारखेची नोंद करावी लागते, जेणेकरून संबंधित श्रेणीनुसार लसीकरण करता येईल. येथेच मुख्य घोळ आहे. पोर्टल आयडीसह जन्मतारखेचा ताळमेळच होत नाही. कोणताही 40-42 वर्षांचा व्यक्ती जर स्वत:चे वय 45 लिहित असले तर त्याला 45+ व्यक्तीसाठी असलेली लस मिळू शकेल. केंद्रावर आयडी पाहिली जाते परंतु त्याची सर्वांगीण तपासणी होत नाही. तसेही केंद्रावर केवळ मोबाईल क्रमांक आणि संदर्भांकित कोडचीच विचारणा केली जाते.

  7 ओळखपत्रे मान्य

  सद्यस्थितीत कोविन पोर्टलवर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्डद्वारे नोंदणी केली जाते. याचाच अर्थ एक व्यक्ती 7 वेगवेगळ्या ओळखपत्रांच्या आधारे नोंदणी करून सातवेळा लस घेऊ शकतो.

  आधार ओटीपी आवश्यक

  ज्या प्रकारे आयकर रिटर्न भरतेवेळी संबंधित मोबाईलवर ओटीपी येताच फॉर्ममध्ये व्यक्तिगत माहिती भरली जाते त्याचप्रमाणे कोविन पोर्टलवरही हीच पद्धत वापरली गेल्यास लसीकरणात होत असलेला घोळही संपुष्टात येऊ शकतो.

  ‘जुगाड’ भोवण्याची शक्यता

  सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जुगाड’ करून दोनवेळा लस घेतली असली तरी भविष्यात मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा विदेशात जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केले तर मात्र मोठी अडचण उद्भवण्याची शक्यता आहे.

  ‘कॅप्चा’ला हवा पर्याय

  कोविन पोर्टलवर ऑनलाईन शेड्यूल वाटपावेळी कॅप्चाचा पर्याय आहे परंतु काही स्क्रीन कॅप्चा वाचूही शकतात. याऐवजी सरकारने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सारख्या युक्तिचा वापर केला तर या समस्येपासून मार्गही काढता येईल.