तलवारीने केक कापला; व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला; मग् पोलिसांनी पकडून ठोकला

  हिंगणघाट (Hinganghat) : वाढदिवसाचा उत्साह (Enjoyment Of Birthday ) शिगेला पोहोचल्यानंतर युवा पिढी काय करेल याचा नेम नाही. सध्या तलवारीने (sharp sword) केक कापण्याची अजब प्रथा युवा पिढीत रुढ होत आहे. अशीच धक्कादायक घटना हिंगणघाट शहरातील घडली. यामध्ये भाईगिरी (Dawn) करणाऱ्या काही युवकांनी मित्राचा वाढदिवस (Friends Birthday) मध्यरात्री हिंगणघाट येथील संत गोमाजी वॉर्ड परिसरात साजरा केला.

  दरम्यान ‘बर्थ डे बॉय’ने चक्क तलवारीने केक कापला. काही युवकांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांच्या हाती व्हिडिओ लागल्यानंतर कथित भाईला पोलिसांनी अटक केली. (Birthday Boy cut the cake with a sharp sword in Hinganghat; Police arrested the accused)

  प्रतिक हनुमान ठाकरे (१९) (Prateek Hanuman Thackeray) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रतिकचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी जल्लोषात तो साजरा केला. मात्र, “भाईगिरी’ची क्रेझ युवकांना असल्याने त्यांनी इतरांसारखे आपणही तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करू असे ठरविले. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने युवक गोमाजी वॉर्डातील चौकात मध्यरात्री एकत्र आले आणि एका टेबलवर सात ते आठ केक ठेवून ते केक धारदार तलवारीने कापले.

  काही युवकांनी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बनविला. तो व्हिडीओ गुन्हे शोध पथकाचे प्रमुख विवेक बन्सोड यांना प्राप्त झाला. त्यांनी तत्काळ याची दखल घेत ही बाब पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना सांगितली. दरम्यान, व्हिडिओत तलवारीने केक कापून दहशत पसरविणाऱ्या प्रतिकचा शोध घेत त्यास बेड्या ठोकल्या. ही कारवाई विवेक बन्सोड, पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले यांनी केली.

  सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल…
  काही दिवसांपूर्वी मुंबई येथील मीरा भाईदर येथील एका कथिन “डॉन’ ने भर चौकात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. याचा व्हिडीओ सोज्चल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करीत अटक केली होती. असाच प्रकार हिंगणघाट येथे झाला असून गुन्हेगारी जगताची “क्रेझ’ असलेल्या प्रतिकनेही तलवारीने केक कापून व्हिडीओ व्हायरल केला. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून त्याच्या मुसक्‍या आवळल्या.