पेट्रोल चोरण्यापूर्वी केला डान्स; घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद

पेट्रोल चोरीची ही घटना शहरातील एका सोसायटीच्या (society) सीसीटीव्ही कॅमऱ्यात (CCTV camera) कैद झाली. यामध्ये अज्ञात चोरट्याने दुचाकीतील पेट्रोल चोरण्यापूर्वी डान्स केला. व्हिडिओ पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.

    नागपूर (Nagpur) : शस्त्राचा धाक दाखवून किंवा हातचलाखी करून चोरी करणारे अनेक चोरटे (thieves) पोलिसांनी (Nagpur Police) पकडले; मात्र नागपुरात डान्सर पेट्रोल चोराला (the dancer petrol thief) पकडण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. चोरट्याचं वैशिष्ट्य म्हणजे, तो चोरी करण्यापूर्वी चक्क डान्स करतो. (dances before stealing)

    पेट्रोल चोरीची ही घटना शहरातील एका सोसायटीच्या (society) सीसीटीव्ही कॅमऱ्यात (CCTV camera) कैद झाली. यामध्ये अज्ञात चोरट्याने दुचाकीतील पेट्रोल चोरण्यापूर्वी डान्स केला. व्हिडिओ पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले. (Dancing Video Of Petrol Thief in Nagpur)

    डान्स करत चोरी करतांना तुम्ही चोराला बघितले नसेल. पण आसाच एक व्हिडीओ नागपुरातून समोर आला आहे. पेट्रोल चोरी करताना डान्स करतानाचा हा व्हिडीओ आणि डान्सर चोराची नागपुरात चर्चा होत आहे. नागपूरच्या जयताळा भागातील काही दिवसांपासून पेट्रोल चोरीच्या घटना घडत होत्या. दोन दिवसाआधी श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी मधील ग्रीन अंकलेव्हमध्ये अशीच पेट्रोल चोरीची घटना घडली. जेव्हा सीसीटीव्ही चा तपास केला तेव्हा हा डन्सिंग चोर पुढे आला.

    या संदर्भात आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरू आहे. मात्र डान्स करत चोरी करण्याची चोराची ही हटके स्टाईल सध्या नागपूर शहरात चर्चेचा विषय बनला आहे.