विदर्भात कोरोनानंतर आता ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका; रोग पिच्छा सोडेना

अहमदनगरमध्ये चार व नाशिकमध्येही दोघांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

    नागपूर (Nagpur) : आरोग्य विभागाकडून (the health department) प्राप्त झालेल्या अहवालानुसार (the report) राज्यात २७ डेल्टा प्लसचे रुग्ण (Delta Plus patients) आढळले असून यात २१ रुग्ण एकट्या विदर्भातील (Vidarbha) असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यात नागपुरातील ५, अमरावती ६, गडचिरोली ६, यवतमाळ ३ आणि भंडाऱ्यातील एकाचा समावेश आहे.

    अहमदनगरमध्ये चार व नाशिकमध्येही दोघांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

    सोमवारी एकाच दिवशी २७ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. गेल्या काही दिवसातील नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या बघितली तर एक किंवा दोन अशी बोटावर मोजण्या इतकी आहे. बाधितांची संख्या कमी असल्याने नागपुरातील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहे. आतापर्यंत नागपुरात डेल्टाचेच रुग्ण नोंदविण्यात आले होते. मात्र सोमवारी आलेल्या अहवालानुसार यापूर्वी आढळलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे काही रुग्ण असल्याने आता प्रशासनासमोर अधिक सतर्कता घेण्याचे आव्हान आहे. लसीकरणामुळे संसर्ग फारसा वाढत नसला तरी कोरोनाचा धोका कमी झाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.