नागपुरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटतीवर; जिल्ह्यात सोमवारी केवळ ४८२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (The number of corona positive patients) घटतीवर आहे. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून (A corona report received Monday from the district administration's health department) सोमवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार 482 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (Corona positive patients) आढळून आले आहेत.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या (The number of corona positive patients) घटतीवर आहे. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून (A corona report received Monday from the district administration’s health department) सोमवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार 482 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (Corona positive patients) आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 246 रुग्ण, ग्रामीण भागातील 227 रुग्ण आणि जिल्ह्याबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे.

    नागपूर जिल्ह्यात सोमवारी एकूण 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील 12, ग्रामीण भागातील 8 आणि जिल्ह्याबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. आज 13,129 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील 11,098 आणि ग्रामीण भागातील 2031 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 2003 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    जिल्ह्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4 लाख 71 हजार 541 इतकी आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 12 हजार 834 असल्याचे नोंदविण्यात आले. यामध्ये शहरातील 6409 रुग्ण आणि ग्रामीण भागातील 5975 रुग्ण आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण आकडेवारी 8797 वर पोहोचली आहे.