शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून (14-year-old boy) 12 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून 50 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना (threatened a 12-year-old girl with a knife) पुढे आली आहे. भेदारलेल्या मुलीने घटनेच्या तीन दिवसानंतर पालक आणि पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा पोलिसही हादरून गेले.

    नागपूर (Nagpur). शहरात अल्पवयीन गुन्हेगारांकडून गंभीर गुन्हे (serious crimes) करण्याचे प्रमाणात वाढतीवर आहे. ‘नवराष्ट्र डिजिटल मीडियाने’ (Navrashtra Digital Media) ०४ जुलै रोजी ‘वेब सीरिज, क्राईम शोज (Web Series, Crime Shows) मालिकेतून गुन्ह्यांच्या क्लुप्त्यांचेच प्रसारण, पोलिस प्रशासन त्रस्त’ या शीर्षकाखाली बातमी प्रसारित करून नागपुरात गुन्हेगारांची हिम्मत किती वाढली आहे, याचा अल्प लेखाजोगा मांडला होता. दरम्यान शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून (14-year-old boy) 12 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून 50 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना (threatened a 12-year-old girl with a knife) पुढे आली आहे.

    भेदारलेल्या मुलीने घटनेच्या तीन दिवसानंतर पालक आणि पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा पोलिसही हादरून गेले. कुख्यात सराईत गुन्हेगारांपेक्षा अल्पवयीन गुन्हेगारांना कसे आवरायचे? हा मोठा प्रश्न पोलिस विभागाला सतावतो आहे.

    याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद जब्बार यांचे नागपूरच्या गंगाबाई घाट जवळ वाहनांच्या स्पेयर पार्टचे मोठे दुकान आहे तर सिद्धार्थ नगर भागात त्यांचे आलिशान घर आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आरोपी असलेला 14 वर्षीय मुलगा जब्बार यांच्या घरी पाळीव कबुतरांना दाणे टाकण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला जब्बार यांच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. याचाच फायदा घेत काही दिवसांपूर्वी 14 वर्षीय आरोपी मुलाने त्याच्या दोन साथीदारांसह जब्बार यांची बारा वर्षे मुलगी मेहंदी क्लासला जात असताना तिच्या गळ्यावर चाकू लावून अडविले. तिघांनी तिचे हात दोरीने बांधत तिला निर्जन ठिकाणी नेले. आणि तुझ्या घरातून 50 लाख रुपये आणून दे, अशी मागणी केली.

    तुझ्या आई, वडील आणि भावाला जिवानिशी मारू अशी धमकी तरूणीला देण्यात आलं. मुलगी या घटनेने पुरती घाबरली, त्यामुळे ती आपल्या घरातून काही रक्कम आपल्याला आणून देईल अशी खात्री पटल्यानंतर तिन्ही आरोपींना त्या मुलीला सोडून दिले. मुलगी घरी परतल्यानंतर खूप घाबरलेली होती. आईवडिलांच्या प्रेमापोटी आणि भीतीपोटी दोन दिवस तिने कोणालाच काहीच सांगितले नाही. मुलीची अवस्था पाहून जब्बार कुटुंबियांनी तिची विश्वासाने विचारपूस केली असता, तिने सर्व घटना आई वडिलांना सांगितली.

    जबर धक्का बसलेल्या जब्बार यांच्या कुटुंबीयांनी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याची तक्रार नोंदविली आहे. अल्ववयीन मुलीने दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपींमध्ये एका 14 वर्षीय मुख्य आरोपी मुलगा आणि 20 वर्षीय अन्य आरोपीचा समावेश आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले.