उपराजधानीत आता डेंग्यूचं संकट; ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चाही धोका कायम

आता कोरोनाची रुग्णसंख्या (the Corona patient) नियंत्रणात येते म्हणता म्हणता डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (the Delta and Delta Plus variants) धोका आहे. कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) येणार असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात असताना आता नागपुरात डेंग्यूनं थैमान (dengue is now rampant in Nagpur) घातलं आहे.

    नागपूर (Nagpur).  आता कोरोनाची रुग्णसंख्या (the Corona patient) नियंत्रणात येते म्हणता म्हणता डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (the Delta and Delta Plus variants) धोका आहे. कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) येणार असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात असताना आता नागपुरात डेंग्यूनं थैमान (dengue is now rampant in Nagpur) घातलं आहे.

    नागपुरात कोरोनासोबत आता डेंग्यूनं कहर केला आहे. गेल्या दीड महिन्यात डेंग्यूमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. पियूष उईके या 21 वर्षांच्या तरुणाचाही डेंग्यूनं गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. पियूष राहत असलेल्या गोंड वस्तीमध्ये अनेक डेंग्यूचे रुग्ण आहेत. जानेवारी महिन्यापासून आजवर 170 डेंग्यूचे रुग्ण आढळलेत.

    गेल्या पंधरा ते वीस दिवसांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागपुरात चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये 9 शुक्रवारी महापालिका क्षेत्रात 14 कोरोनाचे रुग्ण सापडले तर 14 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. शुक्रवारी एकूण 2261 रुग्ण सापडले होते. कोरोनासोबत आता डेंग्यूचं दुहेरी संकट ओढवल्यानं नागपूरमध्ये चिंता वाढली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.