सकाळी ८ वाजताच्या शपथविधीला पहाट कसं म्हणू शकता? उपमुख्यमंत्री अजित पवारांची विरोधकांना कोपरखळी

‘मी पहाटे शपथ घेतलीच नव्हती’ असे म्हणत याचे अजित पवारांनी आपल्या खास शैलीत स्पष्टीकरणही दिले आहे. ‘त्या पहाटे’च्या शपथविधीचं भांडवल करणाऱ्या विरोधकांवरी अजित पवारांनी निशाणा साधला.

    नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणालाही न कळवता भल्या सकाळी राजभवनावर जाऊन केलेला शपथविधी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात सर्वात मोठ गूढ ठरलं आहे. दीड वर्ष होत आले तरी पहाटेचा शपथ म्हणून याची अजूनही चर्चा सुरु आहे. अजित पवारांना नेहमीच याबाबत प्रश्न विचारला जातो. नागपूरमध्ये या प्रश्नाला अजित पवारांनी दिलेले उत्तर ऐकून पत्रकारही गोंधळले आहेत.

    ‘मी पहाटे शपथ घेतलीच नव्हती’ असे म्हणत याचे अजित पवारांनी आपल्या खास शैलीत स्पष्टीकरणही दिले आहे. ‘त्या पहाटे’च्या शपथविधीचं भांडवल करणाऱ्या विरोधकांवरी अजित पवारांनी निशाणा साधला.

    ‘तुम्ही त्याला पहाटे पहाटे म्हणता. सकाळी ८ वाजताच्या शपथविधीला पहाट कसं म्हणू शकता? पहाटे म्हणजे ४ वाजता, ५ वाजता किंवा ६ वाजता असते ती पहाट असे उत्तर अजित पवारांनी दिले.

    मी सकाळी साडेसहाला मतदारसंघात कामाला सुरुवात करतो. आणि आज नाही करत, गेल्या ३० वर्षांपासून करत आहे. शपथ झाली ती ८ वाजता. पण जे सूर्यमुखी आहेत, त्यांना ती पहाट वाटते. त्याला मी काहीही करू शकत नाही’, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना कोपरखळी मारली.