देवेंद्र फडणवीस : ‘मी पुन्हा येईल’, असं म्हणाले होते; भविष्यवाणी खरी ठरणार का? नागपुरकरांना लागली उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे.

  नागपूर (Nagpur). महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते (The Leader of the Opposition in the Maharashtra Legislative Assembly) आणि माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, नागपुरकरांना याविषयी अधिक उत्सुकता लागलेली आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळात (Union Cabinet) महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे.

  काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
  नागपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिल्ली ला जाईल अशी चर्चा नेहमीच असते, मात्र आमच्या पक्षात आमचे नेते पीएम मोदीजी जे आदेश करतात ते शिरोधार्य असतो. मात्र, ज्याला भाजप आणि महाराष्ट्राचा राजकारण ज्याला कळतं त्याला हे लक्षात येईल की मी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची सुतराम शक्यता नाहीये.

  शुभचिंतकांना वाटते, मी दिल्लीला जावे !

  हे माझे शुभचिंतक आहेत त्यांना वाटतंय की, मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होईल. मात्र माझ्या दिल्लीला जाण्याची शक्यता काही नाही. त्यांना असं वाटतं की मी दिल्लीला गेलो तर बला टळेल… मात्र बला टळणार नाहीये हे स्पष्ट सांगतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला एक सूचक इशाराच दिला आहे.

  विधानसभा अध्यक्षपदावर फडणवीसांची प्रतिक्रिया
  नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, आधी निवडणूक होऊ द्या, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सर्वांसमोर आणेल. आधी त्यांना निवडणूक घेण्याचा निर्णय करू द्या. ही गुंतागुंत काय ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवायची आहे. जोवर त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोवर आम्ही काहीही प्रतिक्रिया देणार नाही, जेव्हा ते निवडणूक जाहीर करतील तेव्हा आमची रणनिती तुमच्या समोर येईल.