बसस्टॉप पाहिला का कोणी? नागपुरात चक्क बसस्टॉपच चोरीला

गेली अनेक वर्षे हे म्हाळगीनगर बसस्थानक इथे होते. प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी अख्ख बसस्टॉपच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले.

    नागपूर : चोर काय चोरतील याचा नेम कोणालाच लावता येणार आहे. नागपुरात चोरट्यांनी चक्क बसस्टॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागपुरातील म्हाळगीनगर बसस्टॉप हे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. नागपूर महानगरापलिक प्रशासनाला याबाबत काहीच माहित नसल्याचे समोर आले आहे. मात्र बसस्टॉपच चोरीला गेल्याने नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत हे नक्की.

    गेली अनेक वर्षे हे म्हाळगीनगर बसस्थानक इथे होते. प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी अख्ख बसस्टॉपच उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले. मात्र, यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.नागपूर महानगरपालिका प्रशासन झोपेत असून प्रवाशांचे हाल होत असल्याच्या भावना आता नागपूरकर व्यक्त करत आहेत. सध्या या बसस्टॉप चोरणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, याची प्रतिक्षा नागरिक करत आहेत.