नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ; जाणून घ्या सोमवारची आकडेवारी

    नागपूर (Nagpur): राज्यात कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले असल्याचे नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाची (The health department) चिंता वाढली आहे. नागपूर शहरात रविवारी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या (corona positive patients) 06 इतकी नोंदविण्यात आली; मात्र सोमवारी रुग्णांच्या आकडेवारीत दुपटीने वाढ झाली.

    नागपूर शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची आजची आकडेवारी 14 इतकी नोंदविण्यात आली. या तुलनेत जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अजूनही शून्य आहे.

    नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाने तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला आहे.जिल्ह्यात सोमवारी एकूण 3235 कोरोना संशयित रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 2973 चाचण्या शहरी भागातून तर 262 चाचण्या ग्रामीण भागातून घेण्यात आल्या. विभागाकडून 01 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे नोंदविण्यात आले.