नागपुरात मृत्यसंख्येत घसरण; पण कोरोनाचे रुग्ण वाढले; नवीन रुग्णसंख्या ७५०३ वर

नागपूर जिल्ह्य़ात बुधवारी पुन्हा मृत्यूसंख्या खाली घसरून ८५ वर आली, तर दिवसभरात जिल्ह्य़ात ७ हजार ५०३ नवीन रुग्ण नोंदवले गेले. जिल्ह्य़ात सलग चार दिवस मृत्यूसंख्या नव्वदहून खाली असतानाच २७ एप्रिलला १०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने चिंता वाढली होती.

  नागपूर (Nagpur).  जिल्ह्य़ात बुधवारी पुन्हा मृत्यूसंख्या खाली घसरून ८५ वर आली, तर दिवसभरात जिल्ह्य़ात ७ हजार ५०३ नवीन रुग्ण नोंदवले गेले. जिल्ह्य़ात सलग चार दिवस मृत्यूसंख्या नव्वदहून खाली असतानाच २७ एप्रिलला १०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने चिंता वाढली होती. परंतु बुधवारी मृत्यूसंख्या कमी झाल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे. २४ तासांत शहरात ३७, ग्रामीण ३८, जिल्ह्य़ाबाहेरील १० असे जिल्ह्य़ात एकूण ८५ मृत्यू झाले.

  त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ३९२, ग्रामीण १ हजार ७८१, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ३८ अशी एकूण ७ हजार २११ रुग्णांवर पोहचली आहे. शहरात ४ हजार ८०३, ग्रामीण २ हजार ६९०, जिल्ह्य़ाबाहेरील १० असे एकूण ७ हजार ५०३ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ८६ हजार २३१, ग्रामीण १ लाख ६ हजार ३७९, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २२० अशी एकूण ३ लाख ९३ हजार ८३० रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात ४ हजार ५८५, ग्रामीण २ हजार ३५० असे एकूण ६ हजार ९३५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ३५ हजार १९५, ग्रामीण ७४ हजार २२० अशी एकूण ३ लाख ९ हजार ४१५ व्यक्तींवर पोहचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत हे करोनामुक्तांचे प्रमाण ७८.६० टक्के आहे.

  ३२.७५ टक्के कोरोना रुग्णांचा अहवाल सकारात्मक
  शहरात दिवसभरात १९ हजार २४२, ग्रामीणला ७ हजार २८३ अशा एकूण २६ हजार ५२५ संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले. त्याचे अहवाल गुरूवारी अपेक्षित आहेत. परंतु मंगळवारी तपासलेल्या २२ हजार ९०८ नमुन्यांतील ७ हजार ५०३ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण तब्बल ३२.७५ टक्के नोंदवण्यात आले.

  रुग्णांची संख्या ७७ हजार पार
  शहरात ४६ हजार ३५३, ग्रामीण ३० हजार ८३४ असे एकूण जिल्ह्य़ात ७७ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ९ हजार २४ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ६८ हजार १६३ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

  विदर्भात कोरोनामुळे २८५ रुग्ण दगावले
  विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ात २४ तासांत तब्बल २८५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. तर दिवसभरात येथे १५ हजार ३८९ नवीन रुग्णांची वाढ नोंदवली गेली. विदर्भात २६ एप्रिलला २७४ करोनाग्रस्तांचा मृत्यू तर २७ एप्रिलला २५३ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृत्यू कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात असतांनाच मृत्यू संख्येतील वाढ चिंता वाढवणारी आहे. बुधवारी २४ तासांत नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ३७, ग्रामीण ३८, जिल्ह्य़ाबाहेरील १०, असे एकूण ८५ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील २९.८२ टक्केमृत्यूचा समावेश आहे.

  नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ७ हजार ५०३ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २८ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २८३ रुग्ण, अमरावतीत १९ मृत्यू तर ९४६ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २० मृत्यू तर १ हजार २२४ रुग्ण, गडचिरोलीत २१ मृत्यू तर ६२२ रुग्ण, गोंदियात १४ मृत्यू तर ४७६ रुग्ण, यवतमाळला ३० मृत्यू तर ८६३ रुग्ण, वाशीमला १२ मृत्यू तर ३३० रुग्ण, अकोल्यात १३ मृत्यू तर ४०८ रुग्ण, बुलढाण्यात ९ मृत्यू तर ६६२ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ३४ मृत्यू तर १ हजार ७२ नवीन रुग्ण आढळले.