ड्रग्समुळे अनेक मुली उद्ध्वस्त; जाणून घ्या नागपुरात कसे चालते ड्रग्सचे रॅकेट

एकदा कोणाला ड्रग्सचे व्यसन जडले तर त्याला यातून बाहेर काढणे अत्यंत कठिण असते. हा नशाच असा आहे की, एकदा सवय जडली तर त्या वाचून राहवतच नाही. एमडी (मॅफेड्रॉन ड्रग्स) मुळे व्यापारीच नाही तर संपन्न घरातील तरुणीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.

नागपूर. एकदा कोणाला ड्रग्सचे व्यसन जडले तर त्याला यातून बाहेर काढणे अत्यंत कठिण असते. हा नशाच असा आहे की, एकदा सवय जडली तर त्या वाचून राहवतच नाही. एमडी (मॅफेड्रॉन ड्रग्स) मुळे व्यापारीच नाही तर संपन्न घरातील तरुणीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.(how drug racket works in Nagpur)

या ड्रग्सने अनेक मुलींचे जीवन नष्ट केल्याची प्रकरणे शहरात समोर आलेली आहेत. स्वता एनडीपीएस सेलने काही मुलींना ड्रग्स रॅकेटमध्ये पकडले आहे. नशा विक्रीचा व्यवसाय करणारे तरुण पैशांच्या बळावर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवतात. सुरुवातीला त्यांना शौक म्हणून ड्रग्स दिला जातो. ३-४ वेळा सेवन केल्यानंतर त्याचे व्यसनच जडते.

यानंतर ती व्यक्ती परिणामाची तमा न बाळगता ड्रग्ससाठी काहीही करायला तयार होते. विशेषता परराज्यातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या आणि वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना लक्ष्य केले जाते. कुटुंबीय तर महिन्याला साधारण खर्चानुसार पैसे पाठवतात, मात्र व्यसन जडल्यानंतर त्याचा खर्च उचलणे कठिण होते. अशात अनेक मुली काहीही करण्यासाठी तयार होतात.

पोलिसांच्या भीतीने अनेक ड्रग पेडलर मुंबईत लपून बसलेले आहेत. शहरात एमडी ड्रग्स आणणारा साजिद आता मुंबईत स्थायिक झाला आहे. आता तो होलसेलमध्ये एमडीचे काम करतो. सांगण्यात येते की, तो खामला आणि जरीपटकाच्या अनेक व्यापाऱ्यांशी आताही संपर्कात आहे. तसेच त्यांना माल पोहोचविण्याचे काम ही करतो.

दक्षिण नागपुरात पसरवले जाळे
एकेकाळी दक्षिण नागपुरात आबूचा भाचा जावेद बच्चाचे एकछत्र राज्य होते. एमडीसह सापडल्यानंतर तो तुरुंगात होता आणि तेथेच त्याचा मृत्यूही झाला. आता जावेदची जागा नवीन ड्रग पेडलर्सनी घेतली आहे. आशीर्वादनगरचा राहुल आणि हसनबागचा पक्या मोठ्या प्रमाणात मुंबईवरून माल खरेदी करून शहरात विकत आहे. अर्धे अधिक जुने ड्रग पेडलर तुरुंगात आहेत. याचा लाभ नवीन लोक घेत आहेत.

भालदारपुराचा वासी आणि टेका नवी वस्तीचा लंगडा ही शहरातील वेगवेगळ्या परिसरांमध्ये माल विकतो. माहिती मिळाली आहे की, कळमेश्वर परिसरात जुगार क्लब चालवणारा गुई आपल्या खेळाडूंसाठी एमडी मागवतो. नशेत खेळणारा जोशात असतो आणि जुगारावर डाव वाढतच जातो. याचा लाभ क्लब चालविणाऱ्याला होतो.

मुंबईपेक्षा दुप्पट किंमत आणि भेसळयुक्तही
माहिती मिळाली आहे की, मुंबईपेक्षा दुप्पट किंमतीमध्ये येथे एमडी विकली जाते. इतकेच नाही तर अधिक कमाईसाठी ड्रग्समध्ये भेसळ ही केली जाते. मुंबईमध्ये एमडी १२०० ते १५०० रुपये प्रति ग्रॅममध्ये मिळते, तर नागपूरला आल्यानंतर त्याची किंमत ३००० रुपये प्रति ग्रॅम होते. त्यातही भेसळ केली जाते. जानकारांचे म्हणणे आहे की, काही लोक एमडीमध्ये अजीनोमोटो आणि पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचे पावडर मिळवून वजन वाढवतात. काही लोक प्रतिबंधित नाईट्रो १० गोळी मिळवतात. नाईट्रो १० गोळी इन्सोम्नियावर उपचारासाठी दिली जाते. गोळीचे सेवन केल्यानंतर झोप आणि नशा झाल्यासारखे वाटते. झोपेशी संबंधित आजार असला तर डॉक्टर ही गोळी देतात. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ही गोळी मिळत नाही, मात्र ड्रग पेडलर्सची फार्मसीवाल्यांशी सेटिंग असते.

१ पुडीवर ५०० रुपये कमिशन
ड्रग पेडलर पोलिसांपासून वाचण्यासाठी स्वता माल विकत नाही. हेच कारण आहे की, आता मालाची विक्री वाढविण्यासाठी तरुणांना रॅकेटमध्ये सामील केले जात आहे. १८ ते २५ वयोगटातील युवकांना टोळीत सामील करून ड्रग पेडलर आपले हित साधत आहेत. एका पुडीवर ५०० रुपयांचे कमिशन दिले जाते. या युवकांचे काम ड्रग पेडलरकडून पुडी घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे असते.

यापेक्षा सोप्या पद्धतीने कमाई कुठे असेल. युवकही आपले शौक पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जाळ्यात अडकतात. ग्राहकांकडे ड्रग पेडलर्सचे नंबर असतात. ड्रग पेडलर नवीन ग्राहकांना २-३ ठिकाणी फिरवल्यानंतर माल देतात. जर लवकरच या ड्रग पेडलर्सच्या मुसक्या आवळण्यात आल्या नाही तर तरुण पिढीवर त्याचा प्रभाव व्हायला वेळ लागणार नाही.