नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे नागरपूरात ‘रेमडीसिवीर’च्या इंजेक्शनचे १० हजार डोसेस उपलब्ध होणार

    नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तसीच्या तुठवड्यामुळे परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. अशातच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात देखील रेमडीसिविर इंजेक्शनची टंचाई भासत आहे. मात्र, हीच टंचाई संपविण्यासाठी आता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.

    दरम्यान यामार्फत आता नागपूरमध्ये सन फार्मातर्फे या इंजेक्शनचे १० हजार डोसेस उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रेमडेसिविर उत्पादक सन फार्मा कंपनीचे मालक दिलीप सांघवी यांच्याशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चर्चा झाली. याचं पार्शभूमीवर तातडीने ही इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले होते. त्याप्रमाणे, संघवी यांनी पहिल्यांदा तातडीने ५ हजार डोजेस नागपुरात उपलब्ध करुन देणार असल्याचं सांगितलं. तर बाकीचे ५ हजार डोसेस देखील येत्या २ ते ३ दिवसांत उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन दिले आहे.

    नितीन गडकरींचे नागपूरकरांना आवाहन

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांना देखील एक आवाहन केले आहे.“नागपूरकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी सहकार्य करावे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, वारंवार हात धुणे या गोष्टींची सवय लावून घ्यावी. गरज नसल्यास बिलकुल घराबाहेर पडू नये. भीती पसरेल असे कोणतेही कृत्य करु नये. त्याचप्रमाणे, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे.” असं नितीन गडकरी म्हणाले.