‘या’ कारणामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ केला स्थगित

नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच मुलाचे लग्न करणार असल्याचं नितीन राऊत यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला.

    नागपूर: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली आणखी कठोर करण्यात आली आहे. विदर्भात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे विवाह समारंभाला ५० पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये असे आदेश आता देण्यात आले आहेत. अशावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही सामाजिक भान राखत आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

    यासंदर्भातील एक ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे.’नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता माझा मुलगा कुणाल आणि आकांक्षा यांच्या विवाहप्रित्यर्थ नागपुरात २१ फेब्रुवारी रोजी आयोजित स्वागत समारंभ तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय आम्ही राऊत कुटुंबियांनी घेतला आहे. निमंत्रितांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिर आहोत’ असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे.

    ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांचा विवाह सोहळा १९ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नितीन राऊत यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचा ऊर्जामंत्री नितीन राऊत करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच मुलाचे लग्न करणार असल्याचं नितीन राऊत यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला.