ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुका ५ जिल्ह्यांपुरत्याच; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये हे सर्व पक्षांचं मत आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी दोन सर्वपक्षीय बैठका घेतल्या. गरज भासल्यास पुन्हा सर्व पक्षांशी चर्चा करुन निवडणुकीला सामेरं जायचं, अध्यादेश काढायचा की न्यायालयात जायचं यावर निर्णय घेऊ, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

  नागपूर (Nagpur) : पाच जिल्हयात निवडणुकांबाबत (the elections in five districts) निवडणूक आयोगाने (The Election Commission) पत्र पाठवून माहिती मागवलीय. मागच्या वेळेससुद्धा निवडणूक आयोगाने अशी माहिती मागवली होती. तेव्हा कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तशी विनंती आम्ही कोर्ट (the Court) आणि निवडणूक आयोगाला केली होती. माहिती मागवली तरीही निवडणुकीला दोन महिने वेळ आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी महाविकास आघाडी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

  ॲाक्टोबरमध्ये कोरोना वाढेल (The corona will grow in October)
  ॲाक्टोबरमध्ये कोरोना वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी वस्तुनिष्ठ माहिती निवडणूक आयोगाला देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

  ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये (Elections should not be held without OBC reservation)
  राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये हे सर्व पक्षांचं मत आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी दोन सर्वपक्षीय बैठका घेतल्या. गरज भासल्यास पुन्हा सर्व पक्षांशी चर्चा करुन निवडणुकीला सामेरं जायचं, अध्यादेश काढायचा की न्यायालयात जायचं यावर निर्णय घेऊ, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

  राजकारणात अनेकजण अनेक भाषा बोलतात. पण सरकार अधिकारानुसार निर्णय घेईल. आमच्या पक्षाची भूमिका आहे की, निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये. दोन तीन ॲाप्शनवर काम करु. कोर्टाचाही पर्याय आहे. यासोबतच इम्पेरीकल डाटा गोळा करण्याचं सुरु करतोय, अशी माहिती त्यांनी दिली.

  ओबीसीचं आरक्षण टिकावं ही सर्वांची भावना (The sentiment of all is that OBC reservation should be maintained)
  ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तरीही ओबीसी जागेवर ओबीसी उमेदवार देणार. सर्व पक्षांचे हेच मत. ही जिल्हा परिषद निवडणूक ओबीसी विरुद्ध ओबीसी होईल. कारण ओबीसी आता जागरुक आहे. ओबीसी आरक्षणासाठी सर्व विरोधी पक्षाने एकत्र होण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले पक्ष आहे. या सर्वांनी एकत्र यावे, असेही आवाहन पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.