देशातील कोळसा राख गळती व्यवस्थापनात त्रुटी; दुर्घटनेसह प्रदूषणासाठी कारणीभूत

भारतातील कोळसा राख गळती व्यवस्थापनात (Coal ash leakage management) त्रुटी असून दुर्घटनेसह प्रदूषणासाठी (pollution) देखील त्या कारणीभूत ठरत आहेत. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडा आणि कोराडी वीजनिर्मिती केंद्रावर (Khaparkheda and Koradi power plants) अशी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

  नागपूर (Nagpur). भारतातील कोळसा राख गळती व्यवस्थापनात (Coal ash leakage management) त्रुटी असून दुर्घटनेसह प्रदूषणासाठी (pollution) देखील त्या कारणीभूत ठरत आहेत. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडा आणि कोराडी वीजनिर्मिती केंद्रावर (Khaparkheda and Koradi power plants) अशी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

  असर सोशल इम्पॅक्ट अडव्हायजर्स, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर आणि मंथन अध्ययन केंद्र यांनी ‘लेट्स वी फर्गेट-अ स्टेट्स रिपोर्ट ऑफ निग्लेक्ट ऑफ कोल Ash Accidents इन इंडिया’ या अहवालात ही माहिती दिली आहे. मे २०१९ ते मे २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीत तयार केलेल्या या अहवालात देशभरातील केंद्रावर होणाऱ्या राख गळती दुर्घटनांची स्थिती दर्शवली आहे.

  देशभरातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातही राखेच्या गैरव्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर आहे. प्रामुख्याने नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडा आणि कोराडी येथील वीजनिर्मिती केंद्रावर अशी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. येथील वीजनिर्मिती केंद्रातून होणाऱ्या राख गळतीमुळे जलस्त्रोत प्रदूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे गेल्या दोन तीन वर्षांत दिसून आले आहे.

  २०१७ साली कोळशाच्या राखेचा पुनर्वापर करण्याचे धोरण महाराष्ट्राने स्वीकारले. हे धोरण स्वीकारणारे हे पहिले राज्य आहे. २०२१ सालापर्यंत औष्णिक वीजनिर्मिती केंद्राची क्षमता २२ हजार ८९६ मेगाव्ॉट असल्याने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे. या केंद्रातून १४२.१७ लाख मेट्रिक टन राख तयार होते. राखेचा १०० टक्के पुनर्वापर करण्याचे धोरण आहे आणि १५७.२ लाख मेट्रिक टन राखेचा पुनर्वापर होत असल्याची माहिती केंद्राने दिली आहे.

  त्यानंतरही खापरखेडा व कोराडी येथे स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या अभ्यासातून वेगळीच माहिती समोर आली आहे. या दोन्ही केंद्रातून ३० टक्क्यांपेक्षाही कमी राखेचा पुनर्वापर होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. राखेच्या केंद्रावर बरीचशी राख टाकून दिली जाते. एवढेच नाही तर शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्यांमध्ये ती सोडून दिली जाते. त्यामुळे तेथील पाणीही प्रदूषित होत असल्याने दिसून आले आहे.

  देशभरातील दुर्घटनांचे परीक्षण
  एसर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, विंध्यांचल औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, मध्यप्रदेशातील रिलायन्स सेसन वीजनिर्मिती महाप्रकल्प, उत्तर प्रदेशातील अन्परा औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, ओडिशातील तालचर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, झारखंडमधील बोकारो औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, तमिळनाडूतील उत्तर चेन्नई औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, बिहारमधील कहाळगाव औष्णिक वीजनिर्मिती महाकेंद्र येथील कोळशाच्या राखेमुळे झालेल्या दुर्घटनांचे परीक्षण करण्यात आले. महाराष्ट्राचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला.