चर्चित आरोपी बाळा बिनेकरची दिवसाढवळ्या हत्या, पाहा हा धक्कादायक व्हिडिओ…

चर्चित आरोपी बाळ्या (Balya) उर्फ किशोर एकनाथ बिनेकर (Kishor Binekar) याची काल शनिवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. भोले पेट्रोल पंपाजवळ (Petrol pump) त्याची धारदार शस्त्राने हत्या (Murder) करण्यात आली. या हत्येनंतर येथीर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही संपूर्ण घटना या व्हिडिओत कैद झाली आहे.

नागपूर : नागपूर शहरात (Nagpur City) क्लब चालवत (Club ) असलेला एक चर्चित आरोपी बाळ्या (Balya) उर्फ किशोर एकनाथ बिनेकर (Kishor Binekar) याची काल शनिवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. भोले पेट्रोल पंपाजवळ (Petrol pump) त्याची धारदार शस्त्राने हत्या (Murder) करण्यात आली. या हत्येनंतर येथीर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही संपूर्ण घटना या व्हिडिओत कैद झाली आहे. बाळ्या आपल्या कारमधून जात असताना वाटेत एक सिग्नल लागल्यानंतर त्याने कार थांबवली होती. त्यानंतर दुचाकी वाहनांवरील ५ हमलेखोरांनी बाळ्याची गाडी सिग्नलवरती अडवली. तसेच चाकू आणि कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने हल्लेखोरांनी बाळ्याच्या अंगावर वार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करणाऱ्या पाच आरोपींची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात चेतन हजारे, रजत तांबे, आस्मिन आणि अन्य २ व्यक्तींचा समावेश आहे. आरोपी चेतन हजारे हा ९०च्या दशकातील चर्चित असलेले सुनील हजारे यांचा मुलगा आहे. २००१ मध्ये बाळ्याने आपल्या चिल्लर गँगसोबत मिळून आरोपी चेतन हजारे याच्या वडिलांची हत्या केली होती. त्यामुळे आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चेतनने कट रचून बाळ्याची दिवसाढवळ्या हत्या केली.

पाहा हा संपूर्ण व्हिडिओ 

सिग्नलवर अडवली होती कार

लालगंज येथील तलाव जवळच्या परिसरात बाळ्या राहत होता. मात्र, अनेक वर्षांपासून या परिसरात झुगाराचा अड्डा चालत आहे. बाळ्याने आपल्या संपूर्ण घराला क्लब बनवले होते. तसेच बाळ्या आपल्या कुटुंबियांसोबत धरमपेठ येथील लांजेवार रूग्णालयाजवळ राहत होता. शनिवारी संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान, बाळ्या आपल्या घरातून क्लबमध्ये जाण्यासाठी निघाला होता. परंतु भोले पेट्रोल पंप येथील सिग्नल जवळ पोहोचल्यानंतर आरोपी चेतन आणि त्याच्या गँगने मिळून त्याची निर्घृण हत्या केली.