नागपूरमधील धक्कादायक घटना! नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपुरमधील कन्हान नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरूणांचा मृत्यू झाला आहे. हे पाचही तरूण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील होेते. तसेच हे तरूण दर्शनासाठी अम्मा दर्गा येथे आले होते.

    नागपूर: नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पाण्याच्या खोलात गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुुसार, नागपुरमधील कन्हान नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरूणांचा मृत्यू झाला आहे. हे पाचही तरूण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील होेते. तसेच हे तरूण दर्शनासाठी अम्मा दर्गा येथे आले होते.

    सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे तरुण कन्हान नदीत आंघोळ करायला उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाची बुडण्यास सुरुवात झाली. यानंतर एक-एक करुन पाच तरुण नदीत बुडाले आणि वाहून गेले. ही घटना कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या कामठी संकुलात घडली आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळातच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहेत. तसेच पोलीस पथकाकडून पाचही जणांचा शोध सुरू आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, नदीत बुडालेल्या तरूणांची नावे सय्यद लकी २२ वर्ष, अयाज बेग २० वर्ष, अबुंके बेग १८ वर्ष, सिब्दान शेख २१ वर्ष, खवडजा बेग १७ वर्ष अशी आहेत. पाचही तरूणांचे मृतदेह वाहून गेले असून अद्यापही सापडलेले नाहीयेत. तसेच मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.