फोर्स मोटर्सने नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या महसूल व वन खात्यांना दिली २०० ट्रॅक्स तुफान गाड्यांची डिलिव्हरी

पूर्णपणे नवीन ट्रॅक्स तूफान हा ग्राउंड अप न्यू मॉड्युलर युटिलिटी व्हेइकल प्लॅटफॉर्म असून, त्याची बॉडी पूर्णपणे नवीन आहे, गाडीची अंतर्गत रचना पूर्णपणे नवीन आहे, मर्सिडिजपासून प्रेरित नवीन इंजिन त्यात आहे, नवीन उच्च क्षमतेचे सी-इन-सी चेसिस यात आहे, नवीन पॅराबोलिक लीफ स्प्रिंग सस्पेन्शनमुळे या विभागातील सर्वोत्तम स्पेस तसेच आरामदायी रायडिंग या वाहनात आहे.

  • गावकऱ्यांची कोविड लसीकरणासाठी ने-आण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारचा उपक्रम

नागपूर : पुणेस्थित आघाडीची वाहन कंपनी फोर्स मोटर्सने महाराष्ट्राच्या महसूल व वन खात्यांना २०० ट्रॅक्स तुफान गाड्यांची डिलिव्हरी दिली आहे. कंपनीने ही घोषणा केली. नागपूर व अमरावती जिल्ह्यांतील दुर्गम भागामधील गावकऱ्यांना नजिकच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात घेऊन जाण्यासाठी संबंधित खाती या वाहनांचा वापर करणार आहेत. जेणेकरून, लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग येईल. अन्य वाहनांच्या तुलनेत फोर्स मोटर्सच्या ट्रॅक्स तुफानला पसंती देण्यात आली, कारण, ही बहुपयोगी वाहने आहेत आणि एका वाहनाची आसनक्षमता चालक वगळता ११ एवढी आहे.

२०० ट्रॅक्स तुफान गाड्यांच्या ताफ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. नागपूर येथे आज झालेल्या सोहळ्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, पशुपालन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसान फिरोदिया या सोहळ्यात म्हणाले, “कोरोना विषाणू आता अगदी दुर्गम भागातही पसरत आहे आणि ग्रामीण भागातील वाहतूक सुविधांचा अभाव हा तेथील जनतेच्या लसीकरणात मोठा अडथळा ठरत आहे. लसीकरण न झालेल्या ग्रामीण लोकसंख्येला कोविड प्रादुर्भावाचा धोका आहे. दुर्गम भागात राहणाऱ्यांना वाहतुकीची सुविधा पुरवून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आमच्या ट्रॅक्स तुफान लोकांचे प्राण वाचवण्याच्या कामात सहभागी आहेत याचा आम्हाला आनंद आहे.”

पूर्णपणे नवीन ट्रॅक्स तुफान हा ग्राउंड अप न्यू मॉड्युलर युटिलिटी व्हेइकल प्लॅटफॉर्म असून, त्याची बॉडी पूर्णपणे नवीन आहे, गाडीची अंतर्गत रचना पूर्णपणे नवीन आहे, मर्सिडिजपासून प्रेरित नवीन इंजिन त्यात आहे, नवीन उच्च क्षमतेचे सी-इन-सी चेसिस यात आहे, नवीन पॅराबोलिक लीफ स्प्रिंग सस्पेन्शनमुळे या विभागातील सर्वोत्तम स्पेस तसेच आरामदायी रायडिंग या वाहनात आहे.

विक्री व मार्केटिंग विभागाचे अध्यक्ष आशुतोष खोसला म्हणाले, “ग्रामीण भागातील खडतर रस्त्यांवरील दूरवरचे प्रवास अत्यंत आरामदायी व न थकवणारे होतील याची काळजी ट्रॅक्स तुफान नक्कीच घेईल.”

फोर्स मोटर्स लिमिटेडविषयी

फोर्स मोटर्सची स्थापना एन. के. फिरोदिया यांनी 1958 साली केली. उपलब्ध सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य दरातील, विश्वासार्ह आणि परिणामकारक उत्पादनांच्या रुपात सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरातील व्यावसायिक वाहने उपलब्ध करून देणे, हा त्यांचा उद्देश होता.

आजघडीला, फोर्स मोटर्स ही ऑटोमोटिव्ह घटक, ॲग्रीगेट्स, वाहने आणि शेतीचे ट्रॅक्टर तयार करणारी परिपूर्ण एकात्मिक ऑटोमोबाइल कंपनी आहे. ‘ट्रॅव्हलर’ आणि ‘ट्रॅक्स’ ही त्यांची वाहने या विभागात बाजारपेठेत नेतृत्व स्थानी आहेत.

डॉ. अभर फिरोदिया यांच्या नेतृत्वाखालील फोर्स मोटर्स ही या कंपनी समुहातील प्रमुख कंपनीआहे आणि देशभरात 15 उत्पादन केंद्रांसह 12000 जणांचा बळकट कर्मचारीवृंद आहे.

मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या दोन्हीसाठी इंजिन उत्पादित करणारी फोर्स मोटर्स ही जगातील एकमेव कंपनी आहे. मार्च 2018 मध्ये त्यांनी रोल्स-रॉईस पॉवर सिस्टम्स एजीसोबत संयुक्त उपक्रम राबवला. यातून ऊर्जानिर्मिती आणि अंडर फ्लोअर रेल ॲप्लिकेशनसाठीच्या त्यांच्या 10/12-सिलेंडर S1600 इंजिन्सचे (545 ते 1050hp) भारतात उत्पादन करून ते जगभरात वितरित केले जातील.