ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार, सरसंघचालकांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य (Ma Go Vaidya) यांचं काल शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी नागपुरात अखेरचा श्वास घेतला. मा.गो. वैद्य यांच्यावर आज रविवारी (२० डिसेंबर २०२०) अंत्यसंस्कार (Funeral) होणार आहेत.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा.गो.वैद्य (Ma Go Vaidya) यांचं काल शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी नागपुरात अखेरचा श्वास घेतला. मा.गो. वैद्य यांच्यावर आज रविवारी (२० डिसेंबर २०२०) अंत्यसंस्कार (Funeral) होणार आहेत. तसेच सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) यांनी मा.गो.वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचसोबतच भय्याजी जोशींनी ( Bhaiyyaji Joshi ) सुद्धा त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आहे.

नागपुरातील अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तसेच संघासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री उशिरा त्यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन मागोंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता.

मागोंच्या निधनाने संघ परिवारात दुःखाची लहर पसरली आहे. मा. गो. वैद्य यांनी संघाचे विचार आपल्या जीवनात पूर्णतः उतरवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते माजी प्रवक्ते होते. तर तरुण भारत या दैनिकाचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी भूमिका पार पडल्या आहेत.