ganesh tekdi flyover shop

नागपूर. ‘दुष्काळात तेरावा’ या म्हणीप्रमाणे गणेश टेकडी ( Ganesh tekadi) उड्डाणपुलाखाळील दुकानदारांची ( flyover shopkeepers)  स्थिती झाळी आहे. एकतर कोरोना लॉकडाऊननंतर बंद रेल्वेगाड्यांमळे गत ५ महिन्यांपासून त्यांची दुकाने बंद आहे. सर्व बेरोजगार होऊन बसले आहेत, त्यावर मनपा प्रशासनाने सर्व ७२ दुकानदारांना मासिक किराया व मेंटेनन्स शुल्क जमा न करण्याबाबत करारात उल्लेखीत नियम व अटींचे उल्लंघन केल्याबाबत नोटीस जारी केळी आहे. दुकानदारांनी सांगितळे की, मनपाच्या महसूल विभागाद्वारे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना नोटीस देण्यात आली. त्यात मासिक भाडे, मेंटेनन्स शुल्क नगदी जमा न केल्यास त्यांचा परवाना रद्द समजून मनपा सर्व दुकानांना जप्त करेल. त्यामुळे  दुकानदारांमध्ये भोतीसोबतच रोषही पसरला आहे.

काहीच सुविधा नाही
दुकानदारांचे म्हणणे आहे की, मनपातर्फे देखभाल व दुरुस्तीच्या नावावर शुल्क तर वसूल केले जाते. परंतु परिसरात काहीच सुविधा नाही, घाणपाण्याची निकासी व्यवस्था नाही. परिसरात शौचालयाची सुविधाही नाही. कधी गाळ्यांची डागडुजीसुद्धा केली नाही. यामुळे त्या लोकांनी मेंटेनन्स शुल्क देणे बंद केले होते. आता कोरोना 'लॉकडाऊन काळात त्यांना नोटीस जारी करून अन्याय केला जात आहे. दुकानदारांनी कराराचे उल्लंघन केल्याचे मनपा अधिकाऱ्याने सांगितले. २००९ पासूनच या लोकांनी शुल्क जमा केले नाही. त्यामुळे नोटीस बजावण्यात आला आहे.