राज्यातील अभयारण्य १ ऑक्टोबरपासून खुली होणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, लाट ओसरल्यानंतर नियम पुन्हा शिथील करण्यात आले आहेत. आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत.

    नागपूर (Nagpur) : राज्यातील कोरोनाचा प्रभाव (the influence of corona) कमी होत असल्यामुळे आता सरकारकडून (the government) विविध गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहेत. यातच १ ऑक्टोबरपासून राज्यातील जंगल सफारीदेखील (The jungle safari) पुन्हा सुरू होत आहे. ताडोबा-पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानेही (Tadoba-Pench Tiger Project management) कोअरमधील पर्यटनाची दारे उघडण्याची तयारी केली असल्याने पर्यटकांचीही बुकींगसाठी (booking of tourists) लगबग सुरू झाली आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, लाट ओसरल्यानंतर नियम पुन्हा शिथील करण्यात आले आहेत. आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहेत. नवेगावबांध-नागझिरी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या ५ दिवसांचे ७०-८० टक्के बुकिंग झालेले आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पात ऑफलाइन पद्धतीने १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान प्रकल्पांच्या प्रवेशद्वारावर सफारीचे बुकींग करता येणार आहे. पेंच , बोर अभयारण्य, उमरेड -पवनी- कऱहाडला याठिकाणी सर्वप्रथम जंगल सफारींना सुरुवात होईल.

    पावसाची परिस्थिती लक्षात घेता पेंच प्रकल्पातील चोरबाहूली, कोलितमारा, सिल्लारी, खुबाळा, खुर्सापार, सुरेवानी, पवनी पर्यटन गेट तर बोर प्रकल्पातील बोर आणि उमरेड-कऱ्हांडा-पवनी अभयारण्यातील कनहांडला, गोठनगाव गेटवर १ ते १५ ऑक्टोरबर या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटन करता येणार आहे. तर, १६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करता येईल. सफारी दरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.