Instagram वरील मैत्रीने घेतला आजी आणि नातवाचा जीव;  दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले

तरुणी बद्दल विचारणा केली. तरुणीच्या आजीने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आधी त्यांची आणि नंतर १० वर्षीय मुलाची हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी दुचाकीने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री ९ वाजून २६मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली.

 

नागपूर : Instagram या सोशल मीडिया साईट्वरून  झालेली ओळख, मैत्री व एकातर्फी प्रेमातून माथेकरूने प्रियेसीच्या आजीचा व १० वर्षाच्या भावाचा जीव घेऊन, आरोपीने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. दीड वर्षापूर्वी Instagram वर एकमेकांचे पाहून फोटो कथित प्रियेसी व आरोपीची पाहून त्यांची ओळख झाली होती.

संबंधित तरुणीच्या कुटुंबियांना तिच्या मोबाईलद्वारे या मैत्रीची माहिती मिळाली. पालकांनी तिला अभ्यासात लक्ष घालायला सांगत त्याच्या पासून दूर राहण्यास सांगितले. तिचा मोबाईल काढून घेत त्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटून माहिती त्यांनाही दिली. कुटुंबियांनी समजूत घातल्यानंतर तरुणी त्याला टाळू लागली. मात्र तरुण अनेकदा तरुणी राहत असलेल्या कृष्णगर भागात यायचा. तरुणीच्या कुटुंबियांशी वाद घालायचा. एकदा तर तरुणीच्या भावाला मारहाणही केली होती. अनेकदा तो माथेफिरू भेटण्यासाठी त्या तरुणीवर दबाव आणायचा, तिला मारहाण करायचा.

१५ दिवसांपूर्वी ही त्याने तिला जबर मारहाण केली होती. त्यात तिच्या एका डोळ्याला जबर दुखापत झाली होती. तेव्हा धुर्वे कुटुंबातील काही कौटुंबिक मित्रांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती तरुणी मारहाणीनंतर एवढी जास्त घाबरलेली होती, की तिची अवस्था पाहून तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला होता. शिवाय तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या भागात यायचा. मारहाणीत डोळ्याला जबर दुखापत झाल्यानंतर परिसरात तिची ती अवस्था पाहून बदनामी होईल म्हणून धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नातेवाईकांकडे पाठवले.
त्यानंतर माथेफिरू तरुण आणखी चिडला आणि त्याने काल टोकाचं पाऊल उचलत घरी येऊन तरुणी बद्दल विचारणा केली. तरुणीच्या आजीने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आधी त्यांची आणि नंतर १० वर्षीय मुलाची हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी दुचाकीने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री ९ वाजून २६मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने रेल्वे एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली.रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले.