गुरु-शिष्याचे प्रेमप्रकरण; महिलेचे अन्यत्र सूत जुळल्याने शिष्याकडून महिलेची हत्या

जवळपास बारा वर्षांपूर्वी महिलेसोबत आरोपी शिष्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. मागील बारा वर्षांपासून संबंध असलेल्या महिलेचे दुसऱ्याशी सूत जुळले.

  नागपूर (Nagpur) : गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरात घडली आहे. महिला बौद्ध भिक्खूची (female Buddhist monk) तिच्या शिष्यानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गुरु-शिष्यामध्ये मागील बारा वर्षांपासून प्रेमसंबंध (love affair) असल्याची चर्चा आहे; मात्र महिलेचे अन्य व्यक्तीसोबत सूत जुळल्याने चिडून शिष्याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

  काय आहे प्रकरण?
  नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पिपळा डाक बंगला येथील शिवली बोधी भिक्खू निवास येथे पदाधिकारी असलेल्या बौद्ध भिक्खू महिलेचा तिच्या शिष्याने निर्घृण खून केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. आरोपीने महिलेच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. नंतर हातोड्याने डोके आणि चेहऱ्यावर वार करत तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

  बारा वर्षांपासून गुरु-शिष्याचे प्रेमसंबंध
  जवळपास बारा वर्षांपूर्वी महिलेसोबत आरोपी शिष्याचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. मागील बारा वर्षांपासून संबंध असलेल्या महिलेचे दुसऱ्याशी सूत जुळले. त्यामुळे चिडलेल्या शिष्याने तिचा खून केल्याची परिसरात चर्चा आहे.

  शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Abuse of a minor student by a teacher)
  दरम्यान, नागपुरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी आणखी एक घटना नुकतीच समोर आली होती. अरबी भाषेचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत समोर आली होती. रफिक खान उर्फ मौलाना हाफिज असे आरोपीचे नाव होते. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  आरोपीने पीडित विद्यार्थिनीला तुझ्या कुटुंबाची मदत करणार असल्याचे सांगत जवळीक साधली होती. त्याने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आरोपी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

  मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार (The headmistress raped the student at school)
  महाबळेश्वर (Mahabaleshwar): शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच साताऱ्यात उघडकीस आली होती. महाबळेश्वरमधील शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. नराधम मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.