पोटात खुपसलेला चाकू घेऊन ‘तो’ पोहोचला पोलिस ठाण्यात; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

नागपुरातून एक धक्कादायक प्रकार (A shocking type) समोर आला आहे. येथे एक तरुण पोटात चाकू (knife in his stomach) घेऊन पोलीस ठाण्यात (the police station) दाखल झाला. त्याला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हत्येच्या प्रयत्नातून तरुणाच्या पोटात चाकू खुपल्याचा प्रकार घडला आहे.

    नागपूर (Nagpur). नागपुरातून एक धक्कादायक प्रकार (A shocking type) समोर आला आहे. येथे एक तरुण पोटात चाकू (knife in his stomach) घेऊन पोलीस ठाण्यात (the police station) दाखल झाला. त्याला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हत्येच्या प्रयत्नातून तरुणाच्या पोटात चाकू खुपल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Kapilnagar police station) आहे. हत्येच्या झालेल्या प्रयत्नात चक्क तरुणाच्या पोटात चाकू अडकला. पोटात चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला.

    या जखमी तरुणाचं नाव विनय राबा आहे. मित्रांसोबतच्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेत आणखी दोन मित्र जखमी झाले आहेत. विनयच्या पोटात चाकू घुपसल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

    या व्हिडीओमध्ये मुलाच्या पोटात चाकू अडकल्याचं दिसत आहे. अशाच अवस्थेत हा तरुण पोलीस ठाण्यात दाखल झाला. काही वेळाने हा तरुण मित्राच्या बाईकच्या मागे बसण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच वेळेत तो पोलिसांच्या गाडीच्या दिशेने चालू लागतो. तरुणाच्या पोटातून रक्त वाहत आहे. शिवाय त्याच्या डोक्यालाही मारहाण झाल्याचं दिसत आहे. हा भयंकर व्हिडीओ येथे उभ्या असलेल्या व्यक्तीने काढला आहे.