
नागपुरमधील कळमेश्वरच्या उबगी फार्ममधील या या मृत कोंबड्या आहेत. या परिसरात जोरदार आवाजात डीजे लावण्यात आला होता. त्यामुळे फार्ममधील कोंबड्या घाबरल्या आणि सैरावरा पळू लागल्या. या झालेल्या कोंबड्यांच्या चेंगराचेंगरीत २५० कोंबड्या मेल्या आहेत.
नागपूर: राज्यात बर्ड फ्लूचे (Bird flu) संकट घोंघावत असतानाच आता नागपुरात डीजेच्या दणदणाटामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. कोंबड्यांचा मृत्यू हा डीजेच्या आवाजामुळेच झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून याला मिळालेला नाही.
कळमेश्वरच्या उबगी फार्ममधील या या मृत कोंबड्या आहेत. या परिसरात जोरदार आवाजात डीजे लावण्यात आला होता. त्यामुळे फार्ममधील कोंबड्या घाबरल्या आणि सैरावरा पळू लागल्या. या झालेल्या कोंबड्यांच्या चेंगराचेंगरीत २५० कोंबड्या मेल्या आहेत.
दरम्यान, मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या परिसरातील पोल्ट्री चालकांना प्रशासनाकडून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.