Hinganghat arson case; Chief Investigating Officer cross-examination completed

शहरातील बहुचर्चित अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्यांची साक्ष झाली होती. मात्र, उलटतपासणीचे काम अपूर्ण होते. मागील तारखेला बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने गैरहजर होते. त्यामुळे बुधवारी मुख्य तपास अधिकाऱ्यांच्या उलटतपासणीचे काम न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून पूर्ण करण्यात आले. तर गुरुवारी मुख्य आरोपीची बयान होणार आहे.

    हिंगणघाट : शहरातील बहुचर्चित अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्यांची साक्ष झाली होती. मात्र, उलटतपासणीचे काम अपूर्ण होते. मागील तारखेला बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने गैरहजर होते. त्यामुळे बुधवारी मुख्य तपास अधिकाऱ्यांच्या उलटतपासणीचे काम न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून पूर्ण करण्यात आले. तर गुरुवारी मुख्य आरोपीची बयान होणार आहे.

    जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात बचाव पक्षाचे वकील ॲड. भूपेंद्र सोने यांनी मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव यांच्या उलट तपासणीचे काम पूर्ण झाले. सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांनी अगोदरचे तपास अधिकारी ठाणेदार सत्यवीर बंडिवार यांचा परत एकदा बयान घेण्याचा अर्ज न्यायालयासमोर दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो खारीज केला. त्यामुळे आता सरकारी पक्षाकडून कोणत्याही साक्षदाराची तपासणी होणार नाही.

    20 मे रोजी आरोपीचे बयान होणार असल्याचे सांगण्यात आले. ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे कामकाज केले. गुरुवारी आरोपीचे बयान झाल्यानंतर या प्रकरणावर युक्तिवाद होईल. शिवाय आरोपीला साक्षदारांच्या अजून तपासण्या करायच्या असल्यास न्यायालयाकडे परवानगी मागावी लागणार आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांना सरकारी पक्षातर्फे स्थानिक ॲड. दिपक वैद्य यांनी सहकार्य केले.