पोलीस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

    नागपूर : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडली आहे. मात्र आता पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे. पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

    दरम्यान ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. यावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीबाबतही भाष्य केलं. तसेच पंतप्रधान मोदींबद्दल मुंबईत झालेली पोस्टरबाजी, मोदींनी गुजरातला केलेली मदत, मराठा आरक्षण, तौत्के चक्रीवादळात झालेलं नुकसान यावरही दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

    मुंबईतील घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. याबाबत विचारले असता पंतप्रधानाबद्दल झालेली पोस्टरबाजी हा पोलीस आयुक्तांच्या पातळीवरचा विषय, त्याबाबत मी वाच्यता करणे योग्य नाही, असंही वळसे पाटलांनी म्हटलं आहे.