नागपूर रेल्वे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर गुंडांचा हल्ला; क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण

सोमलवाडा (Somalwada) येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरील (Petrol Pump) कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला (Knife attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी कर्मचाऱ्याला मारहाणसुद्धा (beaten) करण्यात आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( CCTV camera) कैद झाला असून पेट्रोल भरताना झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

    नागपूर (Nagpur). सोमलवाडा (Somalwada) येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरील (Petrol Pump) कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला (Knife attack) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी कर्मचाऱ्याला मारहाणसुद्धा (beaten) करण्यात आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ( CCTV camera) कैद झाला असून पेट्रोल भरताना झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

    वाद टोकाला गेल्यामुळे चाकू हल्ला
    मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील सोमलवाडा येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर एक गुंड गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. गुंडासोबत त्याचे इतर दोन मित्रही होते. हा वाद नंतर टोकाला गेल्यामुळे गुंडाने कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा तसेच चाकू घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये स्वत:चा बचाव करताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाला.

    गुंडासोबत इतर दोघांकडून मारहाणीचा प्रयत्न
    दरम्यान, गुंडासोबत आणखी दोन मित्र आले होते. या दोघांनीही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत वर्दळ असलेल्या नागपूर-वर्धा महामार्गावर हा पेट्रोल पंप आहे. घटनास्थळावरून सोनेगाव पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खडबड माजली आहे.