devendra fadanvis

राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हटले होते की, राज्यसभेच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे.तसेच विधेयक मंजूर होताना काही सदस्यांनी आक्षेप दर्शविला म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घडलेल्या प्रकारचा आत्मक्लेश करण्यासाठी सदस्यांनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं.याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यसभेतील सदस्य अशोभनीय वागले नसते तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता. त्यांचं वागणं अशोभनीयच होतं. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. ”.