आयआयटीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या; जाणून घ्या कारण….

आईने पुष्पकच्या मोबाइलवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आईने शेजाऱ्यांना कळविले. शेजारी त्याच्या घरी गेला आणि त्याने खिडकीतून बघितले असता पुष्पक हा गळफास लावलेला दिसला.

    नागपूर (Nagpur) : आयआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (IIT student committed suicide) ही घटना वानाडोंगरीतील सातपुडे ले-आऊट (Satpude Layout in Wanadongri) येथे गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. पुष्पक ललित संभे (वय २१) (Pushpak Lalit Sambhe), असे मृतकाचे नाव आहे. तो बनारस येथे आयआयटीच्या (IIT at Benaras) तृतीय वर्षाला शिकत होता.

    काही दिवसांपूर्वी पुष्पक, त्याचे वडील व आई महालक्ष्मी पूजनासाठी धामणगाव येथे गेले. गुरुवारी सकाळी पुष्पक हा नागपुरात परतला. दुपारी पुष्पक याने लोखंडी हुकला ओढणी बांधून गळफास घेतला. आईने पुष्पकच्या मोबाइलवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आईने शेजाऱ्यांना कळविले. शेजारी त्याच्या घरी गेला आणि त्याने खिडकीतून बघितले असता पुष्पक हा गळफास लावलेला दिसला.

    शेजाऱ्याने पोलिसांना व पुष्पकच्या नातेवाइकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने संभे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    पुष्पक याचे वडील एमआयडीसीतील एका कंपनीत तर आई सुतगिरणीत काम करते. दुसरी घटना सक्करदऱ्यातील सेवादलनगर येथे शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आकाश प्रकाश परतेकी (वय ३०) (Akash Prakash Parateki) याने दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.