मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीयाचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

शिवसेना आणि राष्ट्रावादी एकत्र लढतील मात्र काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर आम्ही निवडणूक जिंकलो तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा असणार.

नागपूर: विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. मुंबई महापालिका निवडणुक आम्ही भाजप आणि आम्ही एकत्र लढणार आहोत. त्यामुळे महापालिका निवडणुक जिंकल्याशिवाय राहणार नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटले आहे, नागपुरमध्ये ते बोलत होते.

शिवसेना आणि राष्ट्रावादी एकत्र लढतील मात्र काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर आम्ही निवडणूक जिंकलो तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा असणार असल्याचं आठवले म्हणाले. एकीकडे शिवसेनकडून नेते संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात पक्ष विस्ताराचं काम सुरु आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसोबत युती करणार आहोत. भाजपने आम्हाला जागा द्याव्यात, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.