प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

लहान मुलांचा (Children) कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता 'भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन' (Bharat Biotech's Covacin) या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू (Covacin vaccine is now being tested on young children) झाली आहे.

    नागपूर (Nagpur).  लहान मुलांचा (Children) कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता ‘भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन’ (Bharat Biotech’s Covacin) या लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू (Covacin vaccine is now being tested on young children) झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल (The clinical trials) होणार असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर शहराचाही (Nagpur, Maharashtra) समावेश आहे. शुक्रवारपासून नागपूर शहरात लहान मुलांवर (vaccine for kids) लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली.

    दरम्यान लशीचा पहिला डोस देण्याआधीच स्क्रिनिंगमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 2 ते 6 वयोगटातील 48 टक्के लहान मुलांना आधीच कोरोना होऊन (Corona Virus) गेला असल्याचं पुढे आलं आहे. (Kids had antibodies)

    सध्या नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. त्यासाठी 27 मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यात 13 मुलांच्या शरीरात कोविडची अँटिबॉडीज सापडल्या आहेत. त्यामुळे या वयोगटातील अनेक मुलांना असिमटेमॅटिक कोविड आधीच होऊन गेल्याचं समोर आलं आहे. मुलांमध्ये लशीचा पहिला डोस देण्याआधीच अँटीबॉडीज (Corona Antibody) विकसित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

    शुक्रवारी नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांचं क्लिनिकल ट्रायल घेण्यात आलं. नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन हे ट्रायल पार पडलं. या आधी 6 ते 12 आणि 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे क्लिनिकल ट्रायल झाले. गुरुवारी या क्लिनिकल ट्रायलसाठी लागणाऱ्या मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.