नागपुरात थंडीचा जोर पुन्हा वाढला, पारा ११.६ अंशांपर्यंत घसरला

कडाक्याच्या थंडीचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिसेंबरमध्ये थंडीचा फारसा प्रभाव दिसला नाही. जानेवारीमध्ये दोन आठवड्यापासून ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने या महिन्यातही थंडी गायब झाली होती. यादरम्यान कमाल व किमान तापमानही सरासरीच्या वर गेले. उकाडा जाणवू लागला आणि उन्हाचे चटकेही बसत होते. त्यामुळे घरोघरी दिवसा व रात्रीही पंखे सुरू झाले होते. मात्र गत 2-3 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला.

नागपूर (Nagpur).  कडाक्याच्या थंडीचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिसेंबरमध्ये थंडीचा फारसा प्रभाव दिसला नाही. जानेवारीमध्ये दोन आठवड्यापासून ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने या महिन्यातही थंडी गायब झाली होती. यादरम्यान कमाल व किमान तापमानही सरासरीच्या वर गेले. उकाडा जाणवू लागला आणि उन्हाचे चटकेही बसत होते. त्यामुळे घरोघरी दिवसा व रात्रीही पंखे सुरू झाले होते. मात्र गत 2-3 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला.

गार वारे वाहात असल्यामुळे वातावरणात गारवा पसरला. तसेच कमाल व किमान तापमानात घट होऊ लागली. गुरुवारी सकाळपासूनच 4-10 किलोमीटर प्रतितास वेगाने गार वारे वाहात असल्यामुळे चांगलीच थंडी जाणवत होती. दिवसा हलकेसे ढगाळ वातावरण असल्याने उन्ह-सावलीचा लपंडाव सुरू होता. यादरम्यान गत आठवड्यात सुरू झालेले पंखे बंद करावे लागले. गुरुवारी शहराचे कमाल तापमान 29 डिग्री तर किमान तापमान सरासरीपेक्षा 3.4 डिग्री कमी 11.6 डिग्री नोंदविण्यात आले. गत 2-3 दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडी परतल्याची अनुभूती येत आहे.

२० जानेवारीपर्यंत वातावरण थंडच
हवामान विभागानुसार 15 जानेवारीला हलकेसे ढगाळ वातावरण राहणार असून 16-19 जानेवारीदरम्यान निरभ्र वातावरण राहणार आहे. सेच 20 जानेवारीला पुन्हा हलकेसे ढगाळ वातावरण असेल. यादरम्यान शहराचे कमाल तापमान 27-30 डिग्री तर किमान तापमान 12-16 डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अचानक थंडीत वाढ झाल्यामुळे लोकं घरांमध्ये व बाहेर दिवसाही उबदार कपडे घालून दिसत आहे. तर रात्री उशीरा रस्त्याच्या कडेला पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहे.