भावाच्या गाडीवरचा ‘तिचा’ तो शेवटचा प्रवास ठरला; ओढणीने घेतला जीव

सिवनीकडून (Seoni) नागपूरकडे (Nagpur) जाताना महिलेची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात (the rear wheel of a two wheeler) गेल्याने अपघात होऊन जागीच ठार (bike accident and woman died) झाली. मृत महिलेचे नाव सीता हरीसिंग यादव (२९, रा. कातलवाडी, जि. सिवनी, मध्यप्रदेश) असे आहे.

    रामटेक (Ramtek) : सिवनीकडून (Seoni) नागपूरकडे (Nagpur) जाताना महिलेची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात (the rear wheel of a two wheeler) गेल्याने अपघात होऊन जागीच ठार (bike accident and woman died) झाली. मृत महिलेचे नाव सीता हरीसिंग यादव (२९, रा. कातलवाडी, जि. सिवनी, मध्यप्रदेश) असे आहे. घटनेच्या वेळी आईच्या जवळ असलेली आठ महिन्यांची पूर्वी ही बालिका सुखरूप बचावली. (Accidental-death-of-sister-while-going-with-brother-in-Nagpur-rural)

    सविस्तर माहिती अशी, कामठी येथील रहिवासी जितू राजकुमार बोरकर हा सीता यादव हिचा भाऊ आहे. त्याला पाहायला मुलीकडील पाहुणे मंडळी येत असल्याने तो बहिणीला घ्यायला सिवनी जिल्ह्यातील कातलवाडी येथे गेला होता. बहीण-भाऊ व आठ महिन्यांची भाची असे तिघेही सकाळी ९ वाजताच्या सुमारास दुचाकीने रनाळा कामठी येथे जाण्यासाठी निघाले.

    देवलापार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोथिया पालोरा शिवारात सीता हिची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकली व ती कोसळली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सीताला नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. परंतु, घटनेच्या वेळी आईच्या जवळ असलेली आठ महिन्यांची पूर्वी ही बालिका सुखरूप बचावली.

    घटनेची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडकेसह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा व उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. देवलापार पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.