विदर्भात जेईई-नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निकाल

ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत आणि पूर नाही. त्याचप्रमाणे जर एखादा विद्यार्थी पोहोचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रिप्रेझेन्टेशन करावे, त्यावर एनटीए निर्णय घेईल असं सांगितलं जात आहे. मात्र, जिल्हा दंडाधिकारी यांना परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार नसून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) हीच योग्य संस्था असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे.

नागपूर : विदर्भातील (Vidarbha ) पुरग्रस्त परिस्थितीमुळे आजपासून सुरू होणारी जेईई (JEE) आणि नीटची (NEET ) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा येथील पुरामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली होती. परंतु विदर्भात जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, असं उच्च न्यायलयाने (High Court)  सांगतिलं आहे. त्यामुळे विदर्भातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे.

पूर्व विदर्भात शेकडो गावांना पुराचा फटका बसला आहे. ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत आणि पूर नाही. त्याचप्रमाणे जर एखादा विद्यार्थी पोहोचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रिप्रेझेन्टेशन करावे, त्यावर एनटीए निर्णय घेईल असं सांगितलं जात आहे. मात्र, जिल्हा दंडाधिकारी यांना परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार नसून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) हीच योग्य संस्था असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. तसेच संपूर्ण परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं आहे.