जेटसेटगोचे ‘हॉकर ८००’ विमान नागपुरात; भारतात भाडेतत्वावर देणार विमान

केंद्र सरकारने नियमात बदल केल्याने गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारतीय खासगी कंपन्या लिजिंग कंपन्या बनू शकत आहेत. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून परदेशी विमान भाडेतत्त्वावर भारतात आणण्याची ही पहिली वेळ आहे. यामुळे भारतातील विमान क्षेत्राला चालना मिळेल. तसेच येथे रोजगार निर्मिती होईल, असा दावा कनिका टेकरीवाल यांनी  केला.

  नागपूर (Nagpur) : गिफ्ट सिटीच्या (Gift City) माध्यमातून लिज कंपनी (a leased company) बनलेल्या जेटसेटगोने (Jetsetgo) आर्यलँड (यूके)वरून पहिले विमान आणले असून ते मिहानच्या नागपूर (Mihan’s Nagpur) विमानतळावर (Nagpur Airport) उतरवण्यात आले. ‘जेटसेटगो’ ही गिफ्टच्या माध्यमातून बनलेली पहिली लिजिंग कंपनी आहे. या कंपनीने हॉकर- ८०० विमान भाडेतत्त्वावर भारतात आणले आहे.

  मिहान-सेझमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये जेटसेटगो फ्लिट आय.एफ.एस.सी. युनिटद्वारे पहिले विमान आज समारंभपूर्वक आले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होत्या.

  केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, नागरी उड्डयन महासंचालक यांनी यास परवानगी दिली. पहिली लिजिंग कंपनी असल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागला. हे विमान फेब्रुवारी २०२१ ला भारतात येणे अपेक्षित होते. परंतु वेगवेगळ्या अडचणी आल्या. त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्रातील विमानतळावर विमान उतरावायचे असल्याने आधी हैदराबादशी संपर्क साधावा लागला. त्यांनी पार्किंगसाठी जागा नसल्याचे सांगितले. त्यानंतर एमएडीसीशी संपर्क साधला. त्यांनी दोन दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेतला आणि विमानाला पार्किंगसाठी परवानगी दिली, असे जेटसेटगोच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal, founder and chief executive officer) यांनी सांगितले.

  केंद्र सरकारने नियमात बदल केल्याने गिफ्ट सिटीच्या माध्यमातून भारतीय खासगी कंपन्या लिजिंग कंपन्या बनू शकत आहेत. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून परदेशी विमान भाडेतत्त्वावर भारतात आणण्याची ही पहिली वेळ आहे. यामुळे भारतातील विमान क्षेत्राला चालना मिळेल. तसेच येथे रोजगार निर्मिती होईल, असा दावा कनिका टेकरीवाल यांनी  केला.

  पुढील सहा महिन्यांत आणखी दहा विमाने
  ‘हॉकर-८००’ हे विमान आर्यलँड (यूके) येथून आणण्यात आले आहे. तीन महिने व्यवसाय कसा मिळतो, याचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर २०२२ अखेर आणखी सहा विमाने भाडय़ाने भारतात आणली जातील, असे कनिका टेकरीवाल यांनी सांगितले.

  मिहानला बळ मिळेल
  एमएडीसीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी जेटसेटगोच्या विमानाला पार्किंगसाठी तातडीने परवानगी दिली. पालकमंत्री म्हणून आपणास त्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना केली. जेटसेटगोला येथे उतरण्याची परवानगी मिळाली. यामुळे मिहानला बळ मिळेल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा दावा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.