लखीमपूर हिंसाचाराची घटना अत्यंत निंदनीय : जयदीप कवाडे

अत्यंत निंदनीय आणि क्रुर अश्या लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने उद्या, सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पीरीपाचे समर्थन आहे, असे ते म्हणाले. पीरिपातर्फे राज्यभरातील सर्वच जिल्हा, तालुकास्थरावरील कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करीत महाराष्ट्र बंदला यशस्वी करण्यात येणार असल्याची माहिती जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. 

    मुंबई/नागपूर : शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून रस्त्यावर उतरलेल्या बळीराजाकडे केंद्रातील मोदी सरकारचे लक्ष नाही. हेतुपुरस्सर केंद्राकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशात उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे घडलेले हत्यांकांड हे भाजपच्या सुडबुद्धीतूनच घडवण्यात आले आहे, असा थेट आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी केला.

    अत्यंत निंदनीय आणि क्रुर अश्या लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने उद्या, सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पीरीपाचे समर्थन आहे, असे ते म्हणाले. पीरिपातर्फे राज्यभरातील सर्वच जिल्हा, तालुकास्थरावरील कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करीत महाराष्ट्र बंदला यशस्वी करण्यात येणार असल्याची माहिती जयदीप कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

    लखमीपूर घटनेतील इतकी हिंसक वृत्ती नेत्यामध्ये कशी जन्माला आली? असा सवाल उपस्थित करीत, या अगोदर सुद्धा हिटलरने हुकूमशाहीच्या बळावर जनतेचा अतोनात छळ केले. याचीच पुनरावृत्ती आपल्या देशात होत आहे. पंरतु, देशवासिय हे खपवून घेणार नाही. बळीराजावर होणाऱ्‍या अन्यायाला तीव्र विरोध करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले.

    शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी नरसंहार सुरू आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेतल्यामुळे व शेतकरीविरोधी काळे कायदे देशात लागू केल्यामुळे केंद्र सरकारवर शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे.मोदी सरकार भांडवलदारांचे म्हणजेच अदानी व अंबानीचे सरकार आहे. त्यामुळेच भांडवलदारांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार वेळोवेळी घेत आहे.

    केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दुःख दिसत नाहीत. दिल्लीत वर्षभर चालणाऱ्‍या आंदोलनाची दखल घेतली जात नाही.अशात केंद्र सरकारला धडा शिकवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्‍याच्या सन्मानार्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पीरिपा राज्यव्यापी बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होणार, असल्याचेही ते म्हणाले.

    शेतकऱ्यांच्या संघर्षाचा वणवा पेटत आहे

    केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात मंजूर केलेले कृषी कायदे आणि कामगार कायदे हे शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याची सुपारी केंद्र सरकारने घेतलेली आहे. यामुळे शेतकरी आणि कामगार उध्वस्त होणार असून सरकारने याकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या संघर्षाचा वणवा पेटत आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन उध्वस्त होणाऱ्‍या शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना बळ देण्याचे काम करावे आणि काळे कायदे तात्काळ पाठीमागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या अटकेचा निषेध देखील पीरिपा नोंदवणात असल्याचे ते म्हणाले.