बिबट्याचे पिल्लू खापा वनपरिक्षेत मृतावस्थेत आढळले; जाणून घ्या कोणत्या कारणाने झाला मृत्यू

नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या (the Nagpur Regional Forest Department) खापा वन परिक्षेत्रामध्ये (the Khapa Forest) गुरुवारी दुपारी बिबट्याचे एक पिल्लू (A leopard cub) मृतावस्थेत आढळून आले. मोहगाव-पेंढरी नाला (Mohgaon Pendhari Nala) बिटातील कोथुळना सहवन परिक्षेत्र खुबाळा (Kothulna Sahavan) येथे हा प्रकार आढळून आला.

    नागपूर (Nagpur).  नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या (the Nagpur Regional Forest Department) खापा वन परिक्षेत्रामध्ये (the Khapa Forest) गुरुवारी दुपारी बिबट्याचे एक पिल्लू (A leopard cub) मृतावस्थेत आढळून आले. मोहगाव-पेंढरी नाला (Mohgaon Pendhari Nala) बिटातील कोथुळना सहवन परिक्षेत्र खुबाळा (Kothulna Sahavan) येथे हा प्रकार आढळून आला. वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळताच वरिष्ठांना त्याची माहिती देण्यात आली.

    बिबट्याचे मृत पिल्लू सुमारे चार महिन्यांचे असून मादी आहे. या पिल्लाचे सर्व अवयव शाबूत होते. भुकेमुळे किंवा उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

    वन विभागाच्या परवानगीनंतर या पिल्लाचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहिणी बावसकर, रेस्क्यू सेंटरचे डॉ. सैय्यद बिलाल, मानद वन्यजीवरक्षक प्रतिनिधी आकाश कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याच्या शरीराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे खापा वन परिक्षेत्र अधिकारी पी. ए. नाईक यांनी सांगितले.