हायकोर्ट परिसरात आढळले बिबट्याचे वास्तव्य; वनविभागाच्या पथकाकडून परिसराची पाहणी

आठवडाभरापासून शहरात वावरत असलेला बिबट्या (The leopard) आता जुन्या हायकोर्ट परिसर व आयुक्त कार्यालय परिसरात (old High Court premises and the Commissioner's office premises) पोहोचला आहे. काही नागरिकांनी या भागात बिबट दिसल्याचे सांगितल्यावर वन विभागाच्या पथकाकडून आज सकाळी या परिसरात शोध मोहीम (search operation) राबवण्यात आली.

    नागपूर (Nagpur). आठवडाभरापासून शहरात वावरत असलेला बिबट्या (The leopard) आता जुन्या हायकोर्ट परिसर व आयुक्त कार्यालय परिसरात (old High Court premises and the Commissioner’s office premises) पोहोचला आहे. काही नागरिकांनी या भागात बिबट दिसल्याचे सांगितल्यावर वन विभागाच्या पथकाकडून आज सकाळी या परिसरात शोध मोहीम (search operation) राबवण्यात आली. वनविभागाच्या श्वानपथकातील (the Forest Department dog team) स्टेफीनेसुद्धा बिबट्या या परिसरात आल्याचा माग काढला आहे.

    बिबट्याला पकडण्यासाठी बुधवारी महाराजबाग परिसर, पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय परिसर आणि लगतच्या नाल्याच्या काठावर असे एकूण सात पिंजरे लावले होते. परंतु त्या परिसराऐवजी आज तो नवीनच भागात पोहोचला. हा परिसर शासकीय कार्यालयांचा असून अनेक शासकीय इमारती या ठिकाणी आहेत. लागूनच नाला सुद्धा आहे. या मार्गानेच तो या परिसरात पोहोचला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अगदी मध्यवस्तीत बिबट्या वावरत असल्याने वनविभागाचा ताण बराच वाढला आहे.