फूटबॉल खेळाडूंवर वीज कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू

अनुज आणि तन्मय हे मागे मैदानावरच राहिले. दोघेही सोबतच शेडकडे धावत होते. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर अचाकनपणे वीज कोसळली. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे .....

    नागपूर (Nagpur) : नागपुरातील खापरखेडा येथील चनकापूरमध्ये (Chankapur in Khaparkheda) भीषण घटना घडली आहे. येथे नियमित सरावासाठी मैदानावर आलेल्या खेळाडूंवर वीज कोसळल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या खेळाडूंमध्ये एक धावपटू तर दुसरा फुटबॉलपटू आहे. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे मृतांचे शरीर पूर्णपणे भाजले. यातच त्यांचा मृत्यू झाला. तन्मय दहीकर आणि अनुज कुशवाह अशी मृतांची नावे आहेत.

    अंगावर वीज कोसळल्यामुळे खेळाडू पूर्णपणे भाजले
    मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील चनकापूर येथे खुलै मैदान आहे. या मैदानावर खेळाडून नियमित सरावासाठी येतात. येथे काही खेळाडू धावण्याचा सरावर करतात तर काही खेळाडू क्रिकेट, फुटबॉल असे खेळ खेळतात. आजही (10 सप्टेंबर) बरेच खेळाडू चनकापुरातील मैदानावर जमले होते. यावेळी अचानकपणे आकाशात काळे ढग जमा झाले तसेच पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे पाऊस आल्यामुळे खेळाडू मैदानावर असलेल्या शेडकडे धावले. यावेळी मृत अनुज आणि तन्मय हे मागे मैदानावरच राहिले. दोघेही सोबतच शेडकडे धावत होते. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर अचाकनपणे वीज कोसळली. थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर सक्षम गोठीफोडे नावाचा खेळाडू यामध्ये गंभीर जखमी झाला.

    मृतांच्या कुटुंबाला चार लाखांची मदत
    थेट अंगावर वीज कोसळल्यामुळे अनुज आणि तन्मय यांचे शरीर पूर्णपणे भाजले. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सक्षमवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. खापरखेडा पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसेच पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तर दुसरीकडे चांगल्या खेळाडूंचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून चार लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे सावनेरचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी जाहीर केले. असे असले तरी दोन खेळाडूंचा मृत्यू झाल्यामुळे नागपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.