“लॉकडाऊन हा उपाय नाही, प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू”

शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

    नागपूर (Nagpur).  शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

    शनिवारी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा झाली. यावेळी फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही. त्यामुळे रोजगार अडचणीत येतो. त्यामुळे कडक निर्बंध लावून व्यवहार व्हावेत असे मत व्यक्त केले. नागपूर शहरात ८८ लसीकरण केंद्रे आहेत. त्यांची संख्या वाढवून ती १५१ व्हायला हवीत. दररोज ८ ते १० हजार नागरिकांना लस दिली जाते आहे. ती ४० हजारापर्यंत दिली जावी असे सांगितले.

    लसीकरणासाठी सब सेंटर्स सुरू व्हावीत व या कामात एनजीओ ची मदत घेतली जावी अशीही सूचना त्यांनी मांडली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी दवाखान्यात जागा कमी पडते आहे. पुन्हा खाजगी कोविड हॉस्पीटल्स सुरू केले जावेत. होम क्वारंटाईन असूनही बाहेर फिरणाऱ्यांना पकडून क्वारंटाईन सेंटरवर न्यावे अशीही सूचना मांडली गेली. प्रशासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्यात आम्ही सोबत राहू असे त्यांनी स्पष्ट केले.