प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजारावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधी महागडी आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधांची मात्रा देखील अधिक आहे. त्यामुळे, रुग्णांना अल्पदरात औषधी उपलब्ध करून देण्याबाबत (providing medicines at low cost) सरकारने विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Mumbai High court) दिले.

  नागपूर (Nagpur).  म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजारावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधी महागडी आहे. रुग्णांना देण्यात येणारी औषधांची मात्रा देखील अधिक आहे. त्यामुळे, रुग्णांना अल्पदरात औषधी उपलब्ध करून देण्याबाबत (providing medicines at low cost) सरकारने विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Mumbai High court) दिले. तसेच, प्रिस्क्रिप्शन लिहीत असताना औषधांच्या वापराबाबत राज्य शासनाने मार्गदर्शन सूचना जारी करण्याचे (the state government mentioned issuing guidelines) नमूद केले.

  कोरोनाग्रस्त रुग्णांची होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान या रोगावरील उपचार खर्चिक असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यानुसार, शासनासह नॅशनल फार्मास्युटीकल्स प्रायझींग ऑथोरिटी व केंद्रीय औषध नियंत्रकांना आवश्‍यक आदेश दिले.

  दरम्यान, २६ कंपन्यांकडून उत्पादन होणाऱ्या या औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उत्पादन व वितरण याचे रूग्णसंख्येनुसार राज्यांमध्ये नियमन करावे, असेही न्यायालयाने नमूद केले. सरकारी वकीलांनी म्युकरमायकोसिस रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेता येईल, असा १८ मे २०२१ रोजीचा शासन निर्णय न्यायालयात सादर केला. पुढील सुनावणी २७ मे रोजी निश्चित केली आहे.

  न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, केंद्र सरकारतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, अ‍ॅड. संतोक सिंग सोखी, अ‍ॅड. देशमुख, राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील केतकी जोशी, अ‍ॅड. डी. पी. ठाकरे, अ‍ॅड. एन. एस. राव, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांच्यासह अ‍ॅड. एम. अनिलकुमार, आयएमएकडून अ‍ॅड. बी. जी. कुलकर्णी, अ‍ॅड. तुषार मंडलेकर आदींनी विविध पक्षकारांच्या वतीने कामकाज पाहिले.

  बुरशीविषयी जनजागृती करा
  म्युकरमायकोसिस आजार कशामुळे होतो, त्याचा परिणाम काय आणि त्यावर कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत याविषयी विदर्भामध्ये तत्काळ जनजागृती कार्यक्रम राबवा, असे आदेश नागपूर खंडपीठाने नागपूर व अमरावती येथील विभागीय आयुक्तांना दिले. तर, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) त्याला मराठी, इंग्रजी व हिंदी या तीनही भाषेतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. पोस्टर तयार करावे, सोशल मिडियावरून मार्गदर्शक तत्वांचा प्रचार आणि प्रसार करावा असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.