नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत

बसेस बंद असल्यामुळे शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील अनेक स्टार बसेस भंगारात जाण्याच्या स्थितीत आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने स्टार बससेवा बंद आहेत.

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (corona virus) नागपूर शहरातील बससेवा (Nagpur Bus Service) मागील साडेचार महिन्यांपासून बंद आहेत. तसेच या बसेस बंद असल्यामुळे शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील अनेक स्टार बसेस भंगारात जाण्याच्या स्थितीत आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने स्टार बससेवा बंद आहेत.

लॉकडाऊनचा मोठा फटका नागपूरातील बस सेवेला बसला आहे. बसेस बंद असल्यामुळे ५० टक्के बसेसचे टायर खराब झाले आहेत. बसेस बंद असल्याने शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. पुणे महानगर परिवहन मंडळावरही आर्थिक संकट आले आहे.

लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएल बस सेवेला १०० कोटींचे नुकसान झाले आहे. ३ सप्टेंबरपासून पुणे आणि पिंपरीत बससेवा सुरु होणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ य़ांनी दिली. त्यामुळे येथील नागरिकांना प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.